BTS स्टारसारखं दिसण्याचं वेड जीवावर बेतलं, 1,80,00,000 खर्च करत 12 शस्त्रक्रिया... पण
आपला चेहरा सामान्य लोकांप्रमाणे आहे असं त्याला सारखं वाटत होतं. म्यूझिक इंडस्ट्रीत प्रसिद्ध व्हायचं असेल तर कोरियन सिंगरसारखं दिसण्याचं त्याने ठरवल, पण ते त्याच्या जीवावर बेतलं
Canadian Actor Dies : कॅनडा स्टार सेंट वॉन कोलुची (Saint Von Colucci) याचा वयाच्या अवघ्या 22 वर्षी मृत्यू झाला. मृत्यूचं कारण धक्कादायक होतं. एकामागोमाग एक शस्त्रक्रिया (plastic surgeries) केल्याने सेंट वॉन कोलुचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोलुचीने प्रसिद्ध BTS गायक जिमिन (Park Ji-min) यांच्यासारखं दिसण्यासाठी तब्बल 12 कॉस्मेटिक सर्जरी (Cosmetic Procedures) केल्या होत्या. पण या शस्त्रक्रियांचा त्याच्या शरीरावर वाईट परिणाम झाला आणि त्याला रुग्णालयात दाखलक करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. म्यूझिक इंडस्ट्रीत करियर बनवण्यासाठी कोलुची 2019 मध्ये कॅनडाहून दक्षिण कोरियात गेला होता.
22 एप्रिलला कोलुचीने जबड्याची शस्त्रक्रिया करुन घेतली. पण शस्त्रक्रियेदरम्यान त्याला संक्रमण झालं आणि त्याची प्रकृती खालावली. त्याला वेंटिलेशनव ठेवण्यात आलं. पण काहीवेळाताच त्याचा मृत्यू झाला. कोलुचीने तब्बल 12 शस्त्रक्रिया केल्या होत्या. यासाठी त्याने 220,000 डॉलर खर्च केले होते. यात त्याने नाक, फेसलिफ्ट, आयब्रो, डोळे आणि ओठांची शस्त्रक्रिया केली होती.
दक्षिण कोरियाचा गायक पार्क जिमिन याच्यासारखं दिसण्यासाठी कोलुचीने अनेक शस्त्रक्रिया करुन घेतल्या. यासाठी 1 कोटी 80 लाख रुपयांहून अधिक खर्च केला होता. कोलुची याच्या जवळच्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोलुची आपल्या दिसण्यावरुन काहीसा नाराज होता. त्याला आपला चेहऱ्याचा आकार पसंद नव्हता. आपल्या चेहरा सामान्य लोकांप्रमाणे असल्याचं त्याला सारखं वाटायतं. त्यामुळे कोरियात प्रसिद्ध व्हायचं असेल तर चेहरापट्टी बदलावी लागेल असं त्याने मनाशी ठरलं होतं.
2019 मध्ये कोलुची दक्षिण आफ्रिकेत राहायला गेला. तिथे त्याले म्यूझिक इंडस्ट्रीत आपलं नाव कमवायचं होतं. इथं त्याने सात वर्षांचा करार केला. नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तो उत्साहित होता. पण त्याला आपला चेहरा कोरियन लोकांसारखा दिसावा त्यातही प्रसिद्ध सिंगर जिमिनसारखा असावा असंसारखं वाटत होतं. त्यामुळेच त्याने एकामागोमाग एक अशा 12 शस्त्रक्रिया केल्या. पण अति प्रयोगामुळे त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले आणि वयाच्या अवघ्या 22 वर्षी त्याचा मृत्यू झाला.