मुंबई : आता दिवाळी जगभरात साजरी केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनडामध्येही पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी एका सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर जगभरातील भारतीयांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छादेखील दिल्या. मात्र दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांच्याकडून एक चूक झाली परिणामी ते ट्विटरवर ट्रोल झाले आहेत. 



 


जस्टिन ट्रुडो यांनी शुभेच्छा देताना 'दिवाली मुबारक' असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे अनेकांनी 'मुबारक' या शब्दावर आक्षेप घेतला होता. 'मुबारक' ऐवजी 'बधाई' म्हाणावं, 'मुबारक' हा अरेबिक शब्द आहे असेही काहींनी ट्विट करून सांगितले आहे. 


कॅनडाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले जस्टिन ट्रुडो  हे तरूण व्यक्तिमत्त्व फारच चर्चेत असते. अनेक भारतीय सणांमध्ये जस्टीन सहभाग घेतात. अनेक निर्वासितांना आसरा देण्यासाठी त्यांनी कॅनडाची दारं खुली केली आहेत.