नवी दिल्ली :  मध्य अफ्रिकेतील देश चाडचे राष्ट्राध्यक्ष इदरिस डेबी यांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. ते 3 दशकाहून अधिक काळ राष्ट्राध्यक्ष होते. लष्कराने राष्ट्रीय टेलीव्हिजन आणि रेडियोवर याची माहिती दिली आहे. काही तासांपूर्वीच निवडणूक अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इदरिस यांच्या विजयाची घोषणा केली होती. 11 एप्रिलला निवडणूक झाली होती. या विजयासह इदरिस आणखी 6 वर्ष या पदावर राहिले असते. लष्कराने सांगितलं की, डेबी यांचा 37 वर्षीय पूत्र महमत इदरिस डेबी 18 महिने परिषदचं नेतृत्व करतील. लष्करानै संध्याकाळी 6 पासून कर्फ्यूची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इदरिस यांच्या मृत्यूचं कारण अजून समजू शकलेलं नाही. राष्ट्राध्यक्ष उत्तर चाडमधील या संवेदनशील क्षेत्रात ते का गेले होते हे देखील कळालेलं नाही. त्यांच्या शासन विरोधात या ठिकाणी विरोध सुरु होता. त्या ठिकाणी ते का गेले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.



लष्कराचे माजी कमांडर-इन-चीफ इदरिस 1990 मध्ये सत्तेत आल होते. जेव्हा उपद्रवींनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हिसेन हबरे यांना पदावरुन हटवले होते. नंतर त्यांना सेनेगलमध्ये आंतरराष्ट्रीय अधिकरणने मानवअधिकारांचं उल्लंघन केल्याने दोषी ठरवलं होतं. इदरिस यांनी अनेक सशस्त्र विद्रोहाचा सामना केला. पण सत्तेत कायम राहिले. त्यांच्या विरोधात फ्रंट फॉर चेंज आणि कान्कार्ड इन चाड सांगणारा समुह आहे. या समुहाकडे शस्त्र देखील होते. तसेच यांना शेजारील देश लीबियामध्ये प्रशिक्षण मिळालं होतं. नंतर ते 11 एप्रिलला उत्तर चाडमध्ये घुसले होते.