मुंबई : सलमान खानची (Salman Khan) मध्यवर्ती भूमिका असणाऱा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट आणि त्यातील जवळपास प्रत्येक दृश्य प्रेक्षकांच्या आवडीचं. या चित्रपटातील 'मुन्नी' असो किंवा मग पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाब. प्रत्येत पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी घर करणारं ठरलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेला जितकं प्रेम मिळालं तितकंच प्रेम आणि तितकीच दाद सहाय्यक पात्रांनाही मिळाली. त्यातीचल एक पात्र म्हणजे न्यूज रिपोर्टर चाँद नवाब (Chand Nawab). रेल्वे स्थानकावरुन येणाऱ्या- जाणाऱ्यांच्या गर्दीत उभा राहून रिपोर्टींग करणारा आणि मध्येच लोकांच्या येण्याजाण्यामुळं होणाऱ्या अडचणीमुलं चिडचीड करणारा, वेळीच संतापणारा तरीही इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा चाँद नवाब.


पण, तुम्हाला माहितीये का हे पात्र काल्पनिक नसून, 2008-09 मध्ये एका पत्रकाराचा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. जो इतका मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, की चाँद नवाब सर्वांचं लक्ष वेधणारा चेहरा ठरला. ते कराचीतील एका वृत्त वाहिनीमध्ये काम करत असतानाचा हा व्हिडीओ आता खुद्द चाँद नवाब यांनी लिलावासाठी काढला आहे. 


एका फाऊंडेशन अॅपवर त्यांनी हा व्हिडीओ एनएफटीच्या स्वरुपात समोर आणला आहे. याची कमीत कमी किंमत 20 इथेरियम टोकन म्हणजेच 63 हजार 604 डॉलर इतरी आहे. भारतीय प्रमाणानुसार ही किंमत 46 लाख 74 हजार रुपये इतकी होत आहे. 


...आणि व्हिडीओ व्हायरल झाला 
व्हिडीओचा लिलाव करण्यासाठी चाँद नवाब यांनी त्या प्लॅटफॉर्मवर लिहिलं, 'मी चाँदनवाब आहे, व्यवसायानं मी एक पत्रकार आहे. 2008 मध्ये माझा एक व्हिडीओ युट्यूबवर आला होता. जिथं मी रेल्वे स्थानकावर उभा राहून ईदच्या दिवसांमध्ये गर्दी आणि संपूर्ण परिस्थितीचा उल्लेख करत आहे. मला त्यावेळी सारखं थांबावं लागत होतं, कारण लोकांची ये-जा सुरुच होती. पण, त्यामुळंच हा व्हिडीओ व्हायरल झाला. लाखोंच्या संख्येनं हा व्हिडीओ शेअर करण्यात आला.'



भारत- पाकिस्तानातून मिळालं प्रेम 
2016 मध्ये या व्हिडीओला पुन्हा नव्यानं प्रसिद्धी मिळाली. जेव्हा कबीर खाननं त्याच्या चित्रपटामध्ये माझ्यापासूनच प्रेरित एका भूमिकेला स्थान दिलं. मला रातोरात आणखी प्रसिद्धी मिळाली. भारत आणि पाकिस्तानातून प्रेम मिळालं. सलमान खान आणि बजरंगी भाईजानच्या संपूर्ण टीमचंही मला प्रेम मिळालं.