Lunar South Pole : भारतातून अंतराळाशी संबंधित अनेक संशोधनं आजवर झाली. जगाला भारावून टाकणारे सिद्धांत आणि अहवाल भारतानं जगासमोर आणले. ज्यानंतर आता हाच भारत पुन्हा एकदा सर्वांना थक्क करण्यासाठी सज्ज झाला आहे. निमित्त ठरतेय ती म्हणजे भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रो (ISRO) ची चांद्रयान 3 मोहिम. कारण ही मोहिम जागतिक स्तरावरील एक विक्रमच रचणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचं चांद्रयान 3 (Chandrayaan 3) चंद्राच्या ज्या भागावर पोहोचणार आहे तिथं आजवर जगातील कोणताही देश पोहोचलेला नाही. परिणामी ही मोहिम यशस्वी ठरल्यास असं करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. आता राहिला प्रश्न भारताचं चांद्रयान चंद्राच्या नेमक्या कोणत्या भागावर उतरणार आहे, याबद्दलचा तर तेही जाणन घ्या. 


चांद्रयान 3 मोहिमेत पावलोपावली चंद्र आहे साक्षीला... 


चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार आहे. Lunar South Pole असा या ठिकाणाचा उल्लेख केला जातो. अद्यापही कोणत्याच देशानं या ठिकाणाबाबतच फार निरीक्षण केलेलं नाही. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार भारताची ही मोहिम यशस्वीरित्या पार पडल्यास भारत ही किमया करणारा पहिला देश ठरणार आहे. रशियाच्या  लूना-25 मोहिमेतूनही हेच लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण, अपेक्षित वेळेत ही लँडिंग अपयशी ठरली. परिणामी आता भारताकडून ही कामगिरी फत्ते होणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 


चंद्रावरील हा भाग इतका आव्हानात्मक का? 


चंद्र आजपर्यंत जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांसाठी एक आकर्षणाचा विषय ठरला आहे. येथील असमान जमीन, तिथं असणाका काळोख या सर्व गोष्टी आव्हानांमध्ये आणखी भर टाकत असतात. शिवाय ज्यावेळी चंद्रावर रात्र होते तेव्हा येथील दक्षिण ध्रुवावर तापमान उणे 230 अंशांपर्यंत जातं. ज्यामुळं हा भूभाग कमालीचा दुर्मिळ आणि तितकाच भारावणारा असल्याचं म्हटलं जातं. इथं बराच खनिजसाठा असल्याचंही सांगितलं जातं. 


हेसुद्धा पाहा : Chandrayaan 3 चंद्रावर पोहोण्याआधी पृथ्वीवर आले चंद्रावरील 'त्या' चार खड्ड्यांचे नवे Photo 


चंद्र आणि त्याहूनही विज्ञान, संशोधनामध्ये अभिरुची असणाऱ्यांसाठी चंद्राचा दक्षिण ध्रुव कायमच आकर्षणाचा विषय राहिला आहे. तेव्हा आता भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेला यश मिळतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कारण, याच माध्यमातून चंद्राचा एक महत्त्वाचा भाग संपूर्ण जगासमोर येणार आहे.