ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भारताच्या `चांद्रयान 3`चे अवशेष? पाहणारा प्रत्येकजण हैराण
Chandrayaan 3 : भारताच्या वतीनं चांद्रयान 3 अवकाळाच्या दिशेनं झेपावलं आणि चंद्रापर्यंत जाण्याची यानाची ही मोहिम अनेक महत्त्वाकांक्षांच्या साथीनं सुरु झाली. पण, त्यातच एक असं वृत्त समोर आलं की...
Chandrayaan 3 : काही दिवसांपूर्वीच भारताच्या इस्रोकडून चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. भारतीय अंतराळ जगतासाठी तो अतिश. महत्त्वपूर्ण क्षण होता. जगाच्या पाठीवर अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या या चांद्रयान मोहिमेकडून अनेक अपेक्षा ठेवल्या जात असतानाच ऑस्ट्रेलियातून काही अशी दृश्य समोर आली, ज्यामुळं चांद्रयानाची पुन्हा चर्चा होऊ लागली.
ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील 'ती' गोष्ट...
चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणानंतर काही दिवसांतच ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यांवर अशी एक गोष्ट दिसली जी पाहून प्रत्येकजण हैराण झाला. ती साधारण दोन मीटर वर्तुळाकार धातूची गोष्ट होती ज्यावर अनेक तारा अडकल्या होत्या. ही वस्तू पाहताना ऑस्ट्रेलियातील पोलिसांचेही धाबे दणाणले. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार सध्या पोलिसांनी लष्कराशी संपर्क साधला असून, तपास हाती घेतला आहे. काहींच्या मते हा भारताच्या चांद्रयान 3 च्या अवशेषांचाच एक भाग असू शकतो. त्यामुळं आता तपासातून समोर येणाऱ्या अंतिम निरीक्षणाकडेच सर्वांचं लक्ष आहे.
तपासाला वेग
किनाऱ्यांवर सापडलेल्या रहस्यमयी वस्तूचा तपास आता ऑस्ट्रेलियातील अंतराळ संशोधन संस्थेनं हाती घेतला आहे. त्यासंबंधीची माहिती देत अंतराळ संशोधन संस्थेच्या माध्यमातून एक फोटोही शेअर करण्यात आला. जिथं त्यांनी या वस्तूचा तपास सुरु असल्याच्या माहितीला दुजोरा दिला. प्राथमिक माहिती आणि निरीक्षणांनुसार हे अवशेष एखाद्या परदेशी स्पेस लाँचच्या अवशेषांशी संबंधित असावेत असाही अंदाज वर्तवण्यात आला. परिणामी आपण जागतिक स्तरावर काही संस्थांच्या संपर्कात असल्याचंही स्पष्ट केलं.
हेसुद्धा वाचा : चंद्राकडे झेपावलेलं चांद्रयान 3 आता नेमकं आहे कुठे? इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शेअर केली लोकेशन
चांद्रयानाशी नेमका संबंध काय?
अनेक अंदाज आणि तर्कवितर्कांच्या आधारे अंदाज लावायचा झाल्यास ही विचित्र वस्तू आणि ते अवशेष PSLV च्या रॉकेटशी संबंधित आहे. पण, चांद्रयानाशी त्याचा संबंध नसू शकतो ही एक बाजू. कारण आहे ते म्हणजे त्यावर असणारे बार्नाकल अर्थात काही समुद्री जीव. हे जीव समुद्रात्या तळाशी असतात. ते कोणत्याही गोष्टीवर जमण्यास साधारण तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळं हे अशेष पीएसएलव्हीचे असले असं म्हटंल तरीही चांद्रयान 3 शी त्याचा संबंध नसू शकतो.
काही अहवालांनुसार हे अवशेष PSLV रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याचे अवशेष असू शकतात. जेव्हा एखादं रॉकेच लाँच होतं तेव्हा तेव्हा ते विविध टप्प्यांतून पुढे जातं. रॉके जसजसं उंचावर जाऊ लागतं तसतसं त्याचं वजन आणखी हलकं करण्याच्या हेतूनं त्याचे काही भाग वेगळे होतात. जिथं दोन प्राथमिक टप्पे प्रक्षेपणाच्या ठिकाणापासून दूर असणाऱ्या एखाद्या समुद्रात पडतात तर तिसरा भाग हा ऑस्ट्रेलियाच्या नजीक पडण्याची शक्यता असते.