वॉशिंग्टन : सौंदर्य स्पर्धेत रॅम्पवर सौंदर्यवतींचा जलवा पाहायला मिळतो. पण मिस अमेरिका ट्वेंटी ट्वेंटी या स्पर्धेत चक्क रॅम्पवर वैज्ञानिक प्रयोग पाहायला मिळाले. आणि ज्या सौंदर्यवतीनं हा प्रयोग सादर केला तिला चक्क मिस अमेरिकाचा किताबही मिळाला. कोणतीही सौंदर्यस्पर्धा म्हटल्यावर रॅम्पवर चालणाऱ्या सौंदर्यवती डोळ्यासमोर येतात. वेगवेगळ्या वेशभूषेतील रॅम्पवॉक केल्यानंतर त्या आधारे गुणांची मोजणी करुन सौंदर्य स्पर्धांचा निकाल लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिस अमेरिका ट्वेंटी ट्वेंटी या सौंदर्य स्पर्धेत तर कमालच झाली. बायोकेमिस्ट असलेल्या केमिली शेरयर हिनं चक्क स्टेजवर प्रयोग सादर केला. हायड्रोजन पॅरॉक्साईडचं अपघटनाचा प्रयोग सादर केला. केमिलीनं तीन चंचुपात्रात रसायन टाकलं त्या क्षणी त्या चंचूपात्रातून फेस बाहेर पडू लागला. यावेळी प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. जेव्हा केमिलीला तिच्या प्रोफेशनबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिनं एक शास्त्रज्ञ मिस अमेरिका का होऊ शकतो हे आत्मविश्वासानं सांगितलं.



केमिलीची हा प्रयोग सौंदर्यस्पर्धेच्या जजेसनाही आवडला. तिचा आत्मविश्वास पाहून मिस अमेरिका ट्वेंटी ट्वेंटीचा किताबासाठी योग्य असल्याचं मत परिक्षकांचं पडलं. मिस अमेरिका ही ब्युटी विथ ब्रेन असल्याचं केमिलीनं दाखवून दिलं आहे.