काटमांडू : भारताचे शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. घटना आहे नेपाळमधील पश्चिम जिल्ह्यातील अछाम येथील. येथे एका २३ वर्षाच्या तरूणीचा मासिकपाळी दरम्यान गुदमरून मृत्यू झाला. ही तरूणी नेपाळमधील परंपरेनुसार मासिक पाळीच्या कालावधीत घरापासून दूर रहात होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुरामुळे गुदमरला श्वास


पोलिसांनी बुधवारी दिलेली माहिती अशी की, अछाम परिसरातील गौरी नामक २१ वर्षीय तरूणी धुराने भरलेल्या झोपडीत मृत्यू पावलेल्या आवस्थेत शेजाऱ्यांना आढळून आली. नेपाळमध्ये मासिक पाळीच्या काळात महिला आणि तरूणींना घरापासून दूर ठेवण्ची प्रथा आहे. जी आजच्या २१व्या शतकातही पाळली जाते. या प्रथेचे पालन करत ही तरूणी घरापासून दूर असलेल्या झोपडीत राहात होती. मात्र, प्रचंड थंडीपासून स्वत:चा बचाव व्हावा यासाठी या तरूणाने झोपडीत पेटवलेल्या शेकोटीचा धुर झाला. या धुरातच तिचा श्वास कोंडला आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान, तरूणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, शवविच्छेदन अहवाल येण्याची पोलीस वाट पाहात आहेत.


काय आहे परंपरा
मासिक पाळीच्या काळात नेपळमध्ये महिलांना अपवित्र समजले जाते. त्यामुळे अशा अपवित्र काळात महिलांना घरापासून दूर ठेवावे अशी पद्धत नेपाळमध्ये रूढ आहे. त्यासाठी घरापासून काही अंतरावर झोपड्याही उभारल्या जातात. ज्या झोपड्यांमध्या या महिला 'त्या' काळात राहातत. या काळात या महिलांना धर्मीक कामे, स्थळे आणि पुरूष यांना स्पर्ष करण्यास मनाई असते.