मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. अद्यापही या धोकादायक विषाणूचं सावट काही देशांच्या डोक्यावरून दूर झलेलं नाही. त्यामुळे अनेक देश लॉकडाऊन करण्यात आलेत. पण आता काही ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. काही देशांकडून  आता लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे लहान मुलांना देखील घराबाहेर खेळण्यासाठी मनाई होती पण आता काही देशांनी लहान मुलांना बाहेर खेळण्यासाठी आणि मॉर्निंग वॉकसाठी परवानगी दिली आहे. युरोपियन देशांमध्ये, विशेषत: इटली आणि स्पेनमध्ये लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहानमुलांना बाहेर खेळण्यासाठी परवानगी
युरोपियन देशांद्वारे टप्प्याटप्प्याने आणि पद्धतशीरपणे नियम  शिथिल करण्यात येत आहेत. त्यामध्ये स्पेनने तब्बल सहा आठवड्यांनंतर मुलांना बाहेर खेळण्सास परवानगी दिली आहे. तर मोठ्यांना एक मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉक करण्याची मुभा देण्यात आहे. 


इटलीमध्ये देखील लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. 
इटलीमध्ये कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा आता घटला आहे. त्यामुळे इटलीचे पंतप्रधान ग्यूसेप कोंते यांनी परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचा आराखडा तयार केला आहे.  तयार केलेल्या आराखड्या अंतर्गत कारखाने, बांधकाम आणि घाऊक पुरवठा व्यवसायांना योग्य ती काळजी घेत पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


अमेरिकेची परिस्थिती
सध्या अमेरिकेत कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा सर्व देशांच्या तुलनेत मोठा आहे. न्यूयॉर्क आणि मिशिगनमधील अधिकाऱ्यांनी मे महिन्याच्या मध्यापर्यंत सर्व कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  जॉर्जिया, ओकलाहोमा आणि अलास्का येथे काही  कामांना मंजूरी देण्यात आली आहे. 


इटली, ब्रिटेन, स्पेन आणि फ्रान्समध्ये २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत, तर अमेरिकेत मृतांचा ५५ हजारांपेक्षा अधिक आहे.