मुंबई : लहान मुलांचे खेळ हे काही निराळेच असतात. कधी कोणत्या गोष्टीचा वापर त्यांच्या खेळात होईल हे काही सांगता येत नाही. त्यांच्या खेळण्यात मोठ्या लोकांच्या अनेक वस्तूंचा सहभाग असतो. अनेकदा तर किचनमधील सगळी भांडी खेळायला घेतात. पण इथे तर मुलांनी चक्क सापालाच सहभागी करून घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वियतनामधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील धक्कादायक बाब म्हणजे या बच्चे कंपनीने चक्क सापाचीच रशी बनवली आहे. रशी उडीच्या खेळात या मुलांनी सापाचाच सहभाग करून घेतला आहे. 


हा साप मेलेल्या अवस्थेत आहे. पण मेलेल्या सापाचा रशी म्हणून उपयोग करत या बच्चे कंपनीने आपल्या खेळाला वेगळंच रूप दिलं आहे. या व्हिडिओत चार मुलं या मेलेल्या सापासोबत खेळत आहेत. तसेच व्हिडिओ बनवणारी महिला या बच्चे कंपनीला मेलेल्या सापासोबत खेळण्यास प्रोत्साहन देत आहे. 



सापाला बघून सगळ्यांचीच घाबरगुंडी उडते. पण ही बच्चे कंपनी चक्क त्या सापासोबतच खेळत आहेत. सापा हा विषारी प्राणी आहे आणि या मुलांचा सापासोबत असा वावर थोडा भीतीदायक आहे. हा व्हिडिओ क्राफू टीव्ही नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलं असून 14 नोव्हेंबर 2019 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 27 सेकेंदाच्या या व्हिडिओला 3 लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.  


पण हा व्हिडिओ बघून हे कळत नाही की, या सापाला नेमकं कुणी मारलं आहे. प्राण्यांसोबत अशी वागणूक योग्य नाही. कुटुंबातीलच महिला लहान मुलांना सापासोबत खेळण्यास प्रोत्साहन देत आहे. पण या मुलांवर चुकीचे संस्कार होत असल्याचंही म्हटलं जात आहे. लहान मुलांच्या मनात प्राण्यांबद्दल प्रेम भावना निर्माण करायला हवी.