Chile Forest Fire : भीषण आगीची बातमी समोर आली आहे. दक्षिण अमेरिकेतील चिलीमधील जंगलात अग्नीतांडव सुरु आहे. या भीषण आगीत जवळपास 46 लोकांचा बळी गेला आहे. तर 1100 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत. जंगल परिसर असल्याने आग झपाट्याने पसरली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगीच्या दुर्घटनेनंतर तत्काळ प्रशासनाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून सध्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील 92 जंगलं या आगीच्या तडाख्यात अडकली आहेत. चिलीचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री कैरोलिना टाहो यांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, आगीतील मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.  विला इंडिपेंडेंसिया येथील अनेक घरं आणि व्यवसायिक दुकानांचे या आगीत मोठं नुकसान झालं आहे. 



या आठवड्यात तापमान असामान्यपणे वाढ असल्याचंगी टाहो म्हणाले.  सर्वात प्राणघातक आग वालपरिसो परिसरात लागली असून तिथल्या लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन टाहो यांनी केलं आहे. क्विल्पु आणि व्हिला अलेमाना शहरांजवळ दोन आगीमुळे किमान 8,000 हेक्टर जमीन नष्ट झाल्याच टाहो यांनी सांगितलं . ते म्हणाले की, विना डेल मारच्या किनारपट्टीवरील रिसॉर्ट शहराला आगीचा जोरदार फटका बसला आहे. या शहराला इतर शहरांपेक्षा जास्त धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या पूर्वेकडील भागात असलेल्या व्हिला इंडिपेंडेनियामध्ये अनेक घरं आणि व्यावसायिक केंद्रांचं नुकसान हे आर्थिकदृष्टीकोनातून चिंताजनक आहे.


आपत्कालनी कार्यवाहीचा भाग म्हणून सरकारने शनिवारपासूनच संचारबंदी लागू केली असून याशिवाय चिलीतील आगीमुळे राजधानीच्या नैऋत्येकडील एस्ट्रेला आणि नवीदाद या शहरातील एक हजार घरं जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. पिचिलेमूच्या सर्फिंग रिसॉर्टजवळील असंख्य लोकांना स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. आणखीही अनेकांना घरं सोडून दुसरीकडे स्थलांतरित व्हावं लागणार असल्याच स्थानिक लोकांचं म्हण आहे. खरं तर चिलीच्या जंगलांमध्ये आग लागण्याची ही पहिली वेळ नाही. या आगीमुळे जंगल परिसरातील आजूबाजूच वातावरणाच तापमान हे 40 अंशांवर गेल आहे. त्यामुळे स्थानिकांवर मोठं संकट घोंगावत आहे.