Vehicles Accident On Highway: थंडीचा महिना सुरु असून दाट धुक्याचं जाळं ठिकठिकाणी दिसून येत. असंच दाट पडत असून हायवेवर गाडी चालवणं कठीण झालं आहे. दाट धुक्यामुळे गाडीचा वेग आणि अंदाज घेणं महत्त्वाचं ठरतं. मात्र असं असताना गाडी चालवताना एक चूक चांगलीच महागात पडू शकते. असाच काहीसा प्रकार चीनच्या हेनान प्रांतातील झेंग्झौ शहरात घडला. एका पुलावर एका मागोमाग एक करत 200 गाड्या एकमेकांवर आदळल्या. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत झेंगक्सिन हुआंगे पुलावर काही गाड्या आणि ट्रकचा अपघात झाल्याचं दिसत आहे. काही ठिकाणी गाड्या दुसऱ्या गाड्यांवर चढल्याचं दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातत काही जण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


200 हून अधिक गाड्यांचं नुकसान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, घटनास्थळी 200 हून अधिक वाहनं होती. तसेच या अपघातात काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. चीन सरकारच्या माहितीनुसार, घटनास्थळी बचावासाठी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या आणि 66 जवान दाखल झाले होते. 



बातमी वाचा- Video: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत 'ही' कामं


स्थानिक हवामान खात्याच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी झेंग्झौसहित काही भागात दृश्यमानता 500 मीटर (1640 फूट) हून कमी होतं. काही भागात हे प्रमाण 200 मीटर इतकं होतं. या घटनेनंतर वाहतूक विभागानं या पुलावरून वाहनांना ये-जा करण्यास बंदी घातली होती. व्हायरल होत असलेले व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सनं लिहिलं आहे की, "किती मोठा अपघात आहे हा, कोणाला इजा झाली नाही, याचं आश्चर्य वाटतं."