नवरीच नाही मिळे नवऱ्याला; चीनमध्ये ‘लेफ्टओव्हर मेन’चा आकडा पाहून म्हणाल प्रकरण गंभीर दिसतंय...
China population News : गेल्या काही काळापासून चीनपुढे अनेक मोठ्या समस्यांनी डोकं वर काढलं असून, आर्थिक संकटाशी झुंजणआऱ्या या देशापुढं असणारी सर्वात मोठी समस्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
China population News : वाढत्या लोकसंख्येमुळं जगभरात एकिकडे संसाधनांवर ताण येत असल्याची चिन्हं असतानाच दुसरीकडे चीन मात्र एका वेगळ्याच समस्येला तोंड देत आहे. ही समस्या आहे देशातील वाढत्या वयाच्या जनसंख्येसंदर्भातली.
चीनमधील घसरलेल्या लोकसंख्येमुळे सध्या अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. गेल्या काही काळापासून चीनला लोकसंख्येशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. चीनमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढ असल्यामुळे जन्मदर घटत आहे. त्यातच आता चीनसमोर आणखी एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.
नवरीच नाही मिळे लग्नाला...
चीनमधील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीय ही तेथील वस्तुस्थिती. सध्या या देशात सुमारे 3.5 कोटी पुरुष एकटेच (Single) आहेत. अशा पुरुषांना ‘लेफ्टओव्हर मेन’ म्हणून संबोधलं जात आहे. अनेक वर्षांपासून या आशियाई देशामध्ये दीर्घकाळ सुरू असलेल्या लिंग असमतोलामुळे चीनमध्ये ही परिस्थिती ओढावली असल्याचं म्हटलं जात आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय विवाह हा या परिस्थितीवरील एकमेव पर्याय असल्याचं सुचवण्यात येत आहे. पण, हा मुद्दासुद्धा इथं वादाला वाचा फोडताना गिसत आहे. 2020 मधील देशांतर्गत जनगणनेनुसार देशात तत्कालिन स्थितीला महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या साधारण 3.4 कोटी इतकी होती.
हेसुद्धा वाचा : Jio पासून एअरटेल आणि Vi युजर्ससाठी मोठी बातमी; फोन कॉलिंगचा नियम बदलला, तुमच्यावर कसा होईल परिणाम?
इंस्टीट्यूट फॉर चाइना रूरल स्टडीजनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सध्या इथं ग्रामीण भागात राहणाऱ्या पुरुषांना जोडीदार शोधण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पारंपरिक लग्नसंस्थेचं कमी होणारं महत्त्वं आणि इतर काही आर्थिक संकटांमुळं चीनमध्ये सध्या हे संकट बळावल्याचं सांगितलं जात आहे.
मॅचमेकिंग आणि चीन...
चीनमध्ये जसजशी लैंगित असमानतेची दरी आणखी रुंदावत आहे, तसतसं काही मॅचमेकर्स चीनमधील पुरुषांची ओळख रशियन महिलांशी करून देण्याच्या हेतूनं इथं आता मॅचमेकिंग सर्विसेस फोफावताना दिसत आहेत. रशियामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असल्याच्या कारणानंही या प्रयोगाला चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे.