चीन : चीनमध्ये व्हाॅट्स अॅप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या कांग्रेसच्या कम्युनिस्ट पार्टीत चीनी अधिकारी या निर्णयावर शिक्कामोर्तब केला जाईल. चीनी यूजर्सने काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या सेवेत अडथळे येत असल्याची तक्रार केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेसेज, व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉल यात देखील अडथळे येत होते. आताही व्हॉईस मेसेजस आणि फोटोज काम करत नाही आहेत. त्यामुळे चीनी अधिकारी नाखूश आहेत. 


चीनने यावर्षी नवीन कायद्यांसहीत ऑनलाईन नियम अधिक कठोर केले आहेत. चीनने यावर्षी नवीन कायद्यांसहीत ऑनलाईन नियम अधिक कठोर केले आहेत. फेसबुक, ट्विटर यांसारख्या वेबसाईट्स आणि विदेशी मीडिया यावर देखील तेथे अनेक बंधने आहेत. 


व्हाॅट्स अॅपची ही समस्या कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीच्या वेळेस उद्भवली आहे. १८ ऑक्टोबरला चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग दुसऱ्यांदा पाच वर्षांसाठी महासचिव बनण्याची शक्यता आहे.