China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने बुधवारी जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. चीनच्या या कामिगरीने अमेरिकेला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे. याचं कारण अमेरिकेतील प्रतिस्पर्धी कंपनी Spaceex गेल्या अनेक काळापासून मिथेनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण त्यांना अद्याप यश मिळालेलं नाही. स्पेसएक्स ही जगातील श्रीमंतांच्या यादीत असणारे एलॉन मस्क (Elon Musk) यांची कंपनी आहे.  स्पेसएक्सच्या नावे अनेक असे रेकॉर्ड आहेत, जे जगातील दुसऱ्या कोणत्याही खासगी कंपनीच्या नावे नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिनी सरकारी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जुके-2 (ZhuQue2) कॅरियर रॉकेटने वायव्य चीनमधील जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून सकाळी 9 वाजता उड्डाण केले. हे उड्डाण यशस्वीपणे पूर्ण झालं आहे. बीजिंगमधील कंपनी लँडस्पेसचा (landscape) जुके-2 लाँच करण्याचा हा दुसरा प्रयत्न होता. लँडस्पेस ही चीनच्या व्यावसायिक प्रक्षेपण क्षेत्रातील सर्वात आधीपासून असणाऱ्या स्पेस कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. 


एलन मस्क और जेफ बेजोस यांना टाकलं मागे


बुधवारी पार पडलेल्या या प्रक्षेपणासह चीनने मिथेन-इंधनयुक्त कॅरिअर व्हेइकल्स लाँच करण्याच्या शर्यतीत एलन मस्क यांच्या स्पेसएक्स आणि जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिनसह अमेरिकेतील प्रतिस्पर्धी कंपन्यांना मात दिली आहे. हे कमी प्रदूषणकारी, सुरक्षित, स्वस्त आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या रॉकेटसाठी योग्य इंधन मानले जाते. या यशस्वी प्रक्षेपणामुळे लँडस्पेस रॉकेट प्रक्षेपित करणारी चीनमधील दुसरी खासगी कंपनी बनली आहे.


केरोसिनच्या सहाय्यानेही चीनने केलं आहे रॉकेटचं उड्डाण


याआधी एप्रिल महिन्यात तियानबिंग टेक्नॉलॉजीने केरोसिन-ऑक्सिजन रॉकेटचं यशस्वीपणे उड्डाण केलंहोतं. यानंतर अशाप्रकारची आणखी रॉकेट विकसित करण्याच्या दिशेन पावलं टाकण्यात आली होती. ज्यांच्यात इंधन भरत पुन्हा वापर केला जाऊ शकते. 2014 पासून जिनपिंग प्रशासनाने अवकाश उद्योग क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी दिली.  तेव्हापासून व्यावसायिक अवकाश कंपन्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. लँडस्पेस ही सर्वात जुनी आणि सर्वोत्तम निधी प्राप्त कंपन्यांपैकी एक आहे.


भारत चांद्रयान-3 साठी सज्ज


14 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आकाशात झेपावणार आहे. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिम इस्रो एमव्हीएम-3 रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च करणार आहे. 


चांद्रयान-3 लॉन्चिंग व्हेइकलच्या मदतीने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरील दुसऱ्या लॉन्च पॅडवरुन आकाशात झेपावणार आहे. यासंदर्भातील जोरदार तयारी सध्या या ठिकाणी सुरु आहे. भारताची ही तिसरी मोहीम आहे. दुसऱ्यांदा भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅण्डींगचा प्रयत्न करणार आहे. तसेच चंद्रयान-3 मधील रोव्हर चंद्रावर उतरवून तेथील माहिती मिळवण्याचा भारतीय शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.