नवी दिल्ली : भारताच्या सीमेजवळ चीन बंकर्स बांधतय.


चीनचं वाढती उपस्थिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये चीनच्या सैनिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय.
याचा फायदा घेत पाकिस्तान राजस्थान सीमेजवळ मोठ्या प्रमाणावर हालचाली करतोय. लष्करी पायाभूत सुविधांची तिथे मोठ्या प्रमाणावर उभारणी केली जातेय.


पाकिस्तानची तयारी


पाकिस्तान लष्करी बंकर्स, बॉर्डर आउटपोस्ट, रस्त्यांचं जाळं अशा अनेक पद्धतीने आपली यंत्रणा भक्कम करतोय. हे सर्व चीनच्या मदतीने केलं जातंय. भारतीय लष्कराच्या लक्षात येऊ नये म्हणून या बांधकामांना वरून झाकण्यात आलंय. शिवाय दोन्ही देशातल्या शिष्टाचाराप्रमाणे भारताला याची कल्पनाही देण्यात आलेली नाही.


भारतावर आक्रमण


भारताच्या राजस्थानच्या सीमेपासून २५ किमी वर पाकिस्तानचा खैरपूर हवाई तळ आहे. तिथे या स्वरूपाची तयारी केली जातेय. तिथे रस्ते, बंकर्स बांधले जात आहेत. चीनच्या मदतीने भारतावर कुरघोडी करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे.