डास आहे चीनचा शत्रू, मारण्यासाठी आखला खास प्लान
आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनने हाती घेतलेले हे अभियान संपूर्ण जगभरासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच, जगाला डासांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गंमचेंजर ठरू शकते. कारण, डास हे मानवी आरोग्याला प्रचंड धोकादायक असतात
बीजिंग : चीन जगातला एक असा देश आहे, ज्याला आपल्या लष्करी सामर्थ्यासाठी विशेष ओळखले जाते. तसेच, कोणतेही काम करत असताना त्यासाठी आखलेली रणनिती हेसुद्धा चीनचे खास वैशिष्ट्य. काम कोणतेही असो चीन त्यासाठी व्यापक अशी व्यूव्हरचना करत असतो. आजपर्यंत अनेक योजनांसाठी मोहीम उघडलेल्या चीनने आता चक्क डास मारण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. चीन डासाला आपला शत्रू मानतो.
डासांचा निपटारा करण्यासाठी अत्याधुनिक रडार
अलिकडे चीनने आपल्या सैन्याला अधिक अधुनिक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हे प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी होत आहेत. मात्र, हे प्रयत्न होत असताना डास या कामात अडथळा आणत आहेत. ज्यामुळे देशवासीयही त्रस्त आहेत. म्हणूनच चीनने डासांचा निपटारा करण्यासाठी अत्याधुनिक रडार विकसित करत आहे. या रडाराच्या माध्यमातून चीनने डासांविरूद्ध युद्ध छेडले आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबत वृत्त दिले आहे.
मॅग्नेटिक लहरी करणार डासांचा निपटारा
दरम्यान, बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची (BIT) सुरक्षा लॅबोरेटरी एक असे प्रोटोटॉइप रडार विकसीत करत आहे. जे दोन किलोमिटर परिसरातील अंतरावरील डासांची माहिती देईल. एकदा का मच्छरांचा ठावठिकाणा दिसला की, या रडारमद्यून इलेक्ट्रो-मॅग्नेटिक लहरी प्रकट होतील आणि त्या डासांवर हल्ला करतील. विशेष असे की, ही यंत्रणा डासांची ओळखही ठेवणार आहे. ज्यात डासाचे लिंग, त्याची प्रजात, ते कोणत्या परिसरात आढळतात, त्याच्या उडण्याची क्षमता, ते किती काळ जिवंत राहू शकतात. किती वेगाने उडतात याचा समावेश असेल.
डासमारो अभियान संपूर्ण जगभरासाठी फायदेशीर
दरम्यान, आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनने हाती घेतलेले हे अभियान संपूर्ण जगभरासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच, जगाला डासांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गंमचेंजर ठरू शकते. कारण, डास हे मानवी आरोग्याला प्रचंड धोकादायक असतात. त्यामुळे डासांचे निर्मूलन झाले तर, जभरात आरोग्यावर होणाऱ्या खर्चावर मोठा आळा बसेल. तसेच, मानवी जीवनही सुखी होईल.