चीनमध्ये अतिप्रचंड भूकंपानं शहर उध्वस्त, शेकडो निष्पापांचा बळी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
China Earthquake : 2023 या वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि त्यातही भूकंपासारख्या घटनांनी अनेकांचाच बळी घेतला. वर्षाच्या शेवटीसुद्धा हे संकट पाठ सोडताना दिसत नाहीये.
China Earthquake : यंदाच्या वर्षाचा शेवट नैसर्गिक आपत्ती आणि संकटांच्या विळख्यातच जात असल्याची भीती वाढली असून, आता त्यात आणखी भर पडली आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे चीनच्या गांसू प्रांतात सोमवारी आलेले अतिप्रचंड तीव्रतेचे भूकंप. सोमवारी रात्री उशिरा चीनच्या गांसू प्रांतामध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. चीन भूकंप नेटवर्क केंद्र (CENC) यांच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू चीनमधीलच लांझू या प्रांतापासून साधारण 102 किमी दक्षिण पश्चिमेला भूगर्भात होता.
चीनच्या उत्तर पश्चिमेला असणाऱ्या गांसू प्रांतामध्ये सोमवारी रात्री 11 वाजून 59 मिनिटांच्या सुमारास हा प्रचंड भूकंप (Earthquake) झाला. या भूकंपाची तीव्रता 602 रिश्टर स्केल इतकी होती. स्थानिक यंत्रणांच्या माहितीनुसार आतापर्यंत या भूकंपानं 111 बळी घेतले असून 100 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. एकंदर परिस्थिती पाहता मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
चीनमध्ये (China) आलेला हा भूकंप इतका मोठा होता ज्यामुळं गांसू शहर मोठ्या प्रमाणात उध्वस्त झालं. इतकंच नव्हे, तर शहरातील अनेक इमारती उध्वस्त झाल्या. भूकंपाची माहिती मिळताच बचाव यंत्रणासुद्धा तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम हाती घेतलं. असं असलं तरीही या महाभयंकर भूकंपामुळं अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची भीती यंत्रणा व्यक्त करत असून, बचाव कार्याला सातत्यानं वेग मिळताना दिसत आहे.
काय आहेत भूकंप येण्यामागची कारणं?
भूगर्भात अस्तित्वात असणारे 7 थर सातत्यानं हालचाल करत असता आणि हे पदर जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा तिथं फॉल्ट लाईन तयार होते. सातत्यानं एकमेकांवर आदळत असल्यामुळं या पदरांची टोकं वळून जास्त दबाव तयार होतो आणि हे पदर अर्थात हे थर तुटू लागतात. ज्यामुळं भूगर्भात तयार झालेली उर्जा बाहेर पडण्यासाठी वाट शोथते आणि भूकंपाचे हादरे जाणवतात.
भूकंप आणि त्याची तीव्रता
0 ते 1.9 रिश्टर स्केल - फक्त सीज्मोग्राफवरच भूकंपाची माहिती मिळते.
2 ते 2.9 - सौम्य कंपनं
3 ते 3.9 - एखादं मोठं वाहन तुमच्या जवळून जावं असा भास
4 ते 4.9 - खिडक्या कुटणं, भिंतीवरील फ्रेम पडणं
5 ते 5.9 - फर्निचरला हादरे
6 ते 6.9 - इमारतींच्या पायाला नुकसान, वरील मजल्यांना धोका
7 ते 7.9 - इमारती कोसळून जमिनीतील पाईप फुटणं
8 त 8.9 - मोठे पूल कोसळणं, त्सुनामीचा धोका
9 आणि त्यापुढील आकडा - एखादी व्यक्ती मैदानात उभी असल्यास त्या व्यक्तीला कंपनं स्पष्टपणे दिसणार