शीचून : Earthquake in China, 40 dead : चीन भूकंपाने हादरले आहे. या भूकंपामध्ये 40हून अधिक जण मृत्यू पावल्याची माहिती मिळतेय. शीचून प्रांताला भूकंपाचा तडाखा बसला. 6.8 रिश्टर स्केल तिव्रतेचा हा भूकंप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या  शीचून प्रांतात सोमवारी 6.8 तीव्रतेचा मोठा भूकंपाचा हादरा बसला. 2017 नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. या भूकंपात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रांतीय राजधानी चेंगडू आणि अधिक दूरच्या प्रांतांना जोरदार हादरले बसले. रस्त्यावरील कार जोरदार धक्का मारल्याप्रमाणे जाग्यावर हलत होत्या. या भूकंपामुळे परिसरातील नागरिक घरातून बाहेर पडून रस्त्यावर धावत सुटल्याचे पाहायला मिळाले.


या  जोरदार भूकंपात 46 जणांचा मृत्यू झाला, असे चीनचे राज्य माध्यम शिन्हुआने  यांनी पत्रकार परिषदेत स्थानिक अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्त दिले. भूकंपाच्या केंद्राजवळील काही रस्ते आणि घरांचे भूस्खलनामुळे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी याचा दळणवळणावर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी संपर्क तुटला आहे. 


भूकंपाच्या केंद्राच्या 50 किमी (31 मैल) आतील धरणे आणि जलविद्युत केंद्रांचे कोणतेही नुकसान नोंदवले गेले नाही. मात्र, प्रांतीय ग्रीडच्या नुकसानामुळे सुमारे 40,000 लोकांना अंधाराचा सामना करावा लागला आहे.


शीचूनच्या नैऋत्य प्रांतात , विशेषत: त्याच्या पश्चिमेकडील पर्वतांमध्ये, किंघाई-तिबेट पठाराच्या पूर्व सीमेवरील भूकंपाचा प्रभाव तेवढा जाणवला नाही. येथील परिस्थिती सामान्य आहे.



सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये पथदीप जोरदार हलताना दिसत आहेत. तसेच लोक इमारतींमधून रस्त्यावर धावत होते. राज्य दूरचित्रवाणीनुसार एकूण 39,000 लोक भूकंपाच्या केंद्रापासून 20 किमी आणि 100 किमीच्या आत 1.55 दशलक्ष लोक राहतात, असे सांगण्यात आले. ऑगस्ट 2017 पासून शीचूनचा सर्वात मोठा भूकंप होता. त्यावेळी 7.0 तीव्रतेचा एक आबा प्रीफेक्चरला धडकला होता.


रेकॉर्डवरील सर्वात शक्तिशाली सिचुआन भूकंप मे 2008 मध्ये झाला होता , जेव्हा वेंचुआनमध्ये केंद्रस्थानी असलेल्या 8.0 तीव्रतेच्या भूकंपात जवळपास 70,000 लोक मारले गेले होते. लोकांचे आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.