Glass Bridge खराखुरा तुटला, 330 फूट उंचीवर अडकला तरुण
ताशी 90 किमी वेगाने वारा वाहणाऱ्या जोरदार वाऱ्याने या पुलाचे नुकसान झाले. पुलाच्या काही भागांतील काचा उडून गेल्या तर काही ठिकाणी काचा फुटल्या.
लाँगजिंग : चीनमधील प्रसिद्ध ग्लास ब्रिजला तुम्ही पाहिले असेलच, (चीनमधील प्रसिद्ध ग्लास ब्रीज तुम्ही पाहिला असेलच) तुमच्यापैकी (तुमच्यापैकी) काही हौसी (हौशी) मंडळींना तर त्या ब्रीजवर जाण्याची इच्छा देखील झाली असेल. डोंगरांच्या मध्यभागी काचेचा हा ब्रिज भयानक तर आहे, परंतु तो तितकाच रोमांचक ही आहे. हा ब्रीज काचेचा बनला असल्यामुळे तुम्ही उंचावरुन अगदी आर पार पाहू शकता. तो ब्रिज जरी काचेचा बांधला गेला असला तरी तो तुटणार नाही असा दावा त्याच्या इंजीनिअरने केला होता. परंतु तो ब्रिज अखेर तुटलाच. त्या ब्रिजवरुन चालणाऱ्या लोकांना वाटत असणारी भीती ही खरी ठरली.
ताशी 90 किमी वेगाने वारा वाहणाऱ्या जोरदार वाऱ्याने या पुलाचे नुकसान झाले. पुलाच्या काही भागांतील काचा उडून गेल्या तर काही ठिकाणी काचा फुटल्या. ही घटना जेव्हा घडली तेव्हा एक व्यक्ती त्या ब्रिजवर होता. या व्यक्तिला (व्यक्तीला) सुमारे 330 फूट अंतरावर लटकलेले पाहिले जाऊ शकत होते. नंतर बचाव कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली आणण्यात आले.
रेलिंगवर लटकत होता
शुक्रवारी ताशी 90 किमी वेगाने गडगडाटी वादळासह पाऊस पडला, त्यामुळे पुलाचे काही ग्लास उडून गेले. यावेळी या ब्रिजवर थरार अनुभवायला आलेला एक माणूस तिथेच अडकला. तो 330 फूट उंच या पुलाचे रेलिंग पकडून तेथेच अडकून पडला होता. नंतर बचाव कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. या घटनेचा फोटो प्रथम चीनी ट्वीटर वेबसाइटवर पोस्ट करण्यात आला आहे.
माणसाला Counselling
अहवालात असे सांगितले गेले आहे की, हा माणूस काही काळ पुलावर अडकला होता. नंतर अग्निशामक दल, पोलिस आणि पर्यटन दलांशी संबंधित अधिकारी तेथे पोहोचले आणि त्याला सुरक्षितपणे खाली आणले. त्या व्यक्तीला प्रथम रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याला काउंसीलिंग (Counselling) देण्यात आले. कारण तो खूप घाबरला होता. सोशल मीडियावर लोक या घटनेला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
असा आहे ब्रिज
चीनचा हा प्रसिद्ध काचेचा पूल लाँगजिंग शहराच्या पियान पर्वतावर असलेल्या रिसॉर्टमध्ये उपस्थित आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पूल ओलांडण्यासाठी, लोकांना काचेच्या बनवलेल्या ब्रिजवरून जावे लागते, जे अगदी भयानक आहे. विशेष म्हणजे चीनच्या हुनान प्रांताच्या चांगचियाचिए शहरातील हा प्रसिद्ध काचेचा पूल आहे, ज्याची लांबी 430 मीटर आहे आणि त्याची रुंदी सहा मीटर आहे.