मुंबई : चीन सरकारने (China Government) मोठा निर्णय घेतला आहे. चीनने त्यांच्या चाईल्ड पॉलिसीमध्ये बदल केला आहे. यानुसार आता दाम्पत्याला 2 ऐवजी 3 अपत्यांना जन्म देता येणार आहे. चीनने सोमवारी 3 चाईल्ड पॉलिसीबद्दल (3 Child Policy) घोषणा केली. शिनुआ या चीनच्या अधिकृत माध्यमाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग (President Xi Jinping) यांच्या अध्यक्षतेकखाली बैठकीचे या आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. (China government has given permit couples to have 3 children)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्णय घेण्यामागचं कारण काय?


चीनमध्ये नुकतीच जणगणना पार पडल्यानंतर लोकसंख्या जाहीर करण्यात आली. या जणगणनेनुसार गेल्या दशकात जन्मदरात घट झाल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. मागील 10 वर्षात सरासरीनं वार्षिक वृद्धी ही  0.53 इतकी होती. तर ही आकडेवारी 2000 ते 2010 मध्ये 0.57 इतकी होती. त्यामुळे सरकारवर या धोरणात बदल करण्यासाठी दबाव निर्माण झाला होता. तसेच चीनमध्ये एकूण लोकसंख्येचा एक मोठा वर्ग हा वयोवृद्ध आहे. त्यामुळे यानुसार सरकारने 2 Child Policy मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. 



सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत चीन गेल्या अनेक वर्षांपासून अव्वल क्रमांकावर कायम आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी चीन सरकारने याआधी 1 अपत्याच्या धोरणावरुन 2 अपत्य जन्माला घालण्याच्या निर्णय 29 ऑक्टोबर 2015 मध्ये घेतला होता. त्यानुसार चीनमधील जोडप्यांना 2 अपत्यांना जन्म देण्याची मुभा देण्यात आली होती.


1979 मध्ये वन चाइल्ड पॉलिसी


चीनने 1979 मध्ये वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त एकाच अपत्याला जन्माला घालण्याचं धोरण ठरवलं होतं. सरकारच्या या धोरणांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येत होता. त्यामुळे अनेक दाम्पत्यांना आपली नोकरी गमवावी लागली. तर महिलांवर गर्भपात करण्याची वेळही ओढावली होती. 


संबंधित बातम्या : 


चीनच्या विरोधात वैज्ञानिकांना मिळाला मोठा पूरावा; कोरोनाच्या उत्पत्तीचे सत्य आले जगासमोर


चीनला एका पाठोपाठ एक बसले तीव्र झटके; नागरिकांमध्ये निर्माण झाली प्रचंड भीती