चीनकडून अमेरिकेवर पलटवार; कोरोनाबद्दल २४ गोष्टी ठरल्या खोट्या
३० पानांच चीनने लिहिलं पत्र
मुंबई : कोरोना व्हायरस जगभर पसरल्यानंतर चीनवर सर्वच स्तरावरून टीका होत आहे. कोरोनामुळे अमेरिका-चीनच्या नात्यातही अंतर निर्माण झालं आहे. हा वाद विकोपाला गेला आहे की, चीनने आता कोरोना व्हायरसच्या प्रकरणात अमेरिकेच्या प्रमुख नेत्यांद्वारे बोलण्यात आलेल्या २४ गोष्टी खोट्या ठरवल्या असून त्याच खंडन केलं आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरस नावाचा घातक व्हायरस बाहेर पडला. तेव्हापासून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि परदेशी मंत्री माइक पोम्पिओ याला 'चीनी व्हायरस' किंवा 'वुहान व्हायरस' नावाने संबोधत आहेत. या जागतिक साथीच्या रोगाकरता पूर्णपणे चीनला जबाबदार ठरवत आहेत.
याला रोखण्यासाठी चीनच्या मंत्रालयातून एक प्रेसनोट जाहिर करण्यात आली. यामध्ये अमेरिकेतील नेत्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले. चीनने कोरोना व्हायरसची माहिती दिली नाही आणि चीनच्या वुहान शहरातून कोरोना पसरला असे आरोप करण्यात आले होते.
चीनने पत्रात नमुद केलेले महत्वाचे मुद्दे
शनिवारी रात्री मंत्रालयाच्या वेबसाइटवर ३० पानांच आणि ११ हजार शब्दांचा एक लेख चीनकडून पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये या सर्व गोष्टींच खंडन करण्यात आलंय. या लेखाची सुरूवात १९ व्या शतकातील अमेरिकेचे राष्ट्रपती अब्राहम लिंकनपासून केली आहे. या लेखात WHO च्या पुराव्यांच्या दाखला देखील दिला आहे. कोणत्याही व्हायरसचं नाव हे कोणत्याही देशाच्या नावावरून असू शकत नाही. त्यामुळे 'कोरोना व्हायरस' असं न संबोधता त्याला 'कोविड-१९' म्हणणं आवश्यक आहे.
लेखाची सुरूवात ही अब्राहम लिंकन यांच्यापासून केली आहे. त्यांनी म्हटलं होतं की,'तुम्ही काही लोकांना काही वेळेसाठी मूर्ख बनवू शकता. किंवा सगळ्या लोकांना काही वेळेकरता मूर्ख बनवू शकता. मात्र तुम्ही सगळ्या लोकांना प्रत्येकवेळी मूर्ख बनवू शकत नाही.' असा दाखला देत चीनने अमेरिकेवर आरोप केले आहेत की, अमेरिका कायम सगळ्यांची दिशाभूल करत असते.
सगळ्या पुराव्यातून स्पष्ट झालं आहे की, कोरोना व्हायरस मानव निर्मित नाही आणि एवढी कोणतीच लॅब सक्षम नाही जिथे कोरोना व्हायरस बनवला जाऊ शकतो.
अनेकांना असं वाटतं की, चीनने कोरोनाची माहिती सर्वांपासून लपवून ठेवली. मात्र चीनचा असा दावा आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनने अनेकदा कोरोनाची माहिती दिली.
लेखात बीजिंगच्या ३४ वर्षीय डॉक्टर ली वेनलियांगच्या प्रकरणातही केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. ज्यांनी वुहानमध्ये आलेल्या नव्या व्हायरसची माहिती सर्वांना दिली होती. Covid-19 ने त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे चीनमध्ये राग आणि शोक व्यक्त केला जात होता.