मुंबई : तैवानच्या (Taiwan) आखात अमेरिकेचा (America) वावर वाढला आहे. अमेरिकेच्या नौदलाचे मोठे जहाज तैवानच्या खाडीत पाठविण्यात आले आहे. याला चीनने विरोध दर्शविला आहे. चीनने (china) याला अमेरिकेचे दादागिरी असे म्हटले आहे. ते या प्रदेशात अशांतता आणि अस्थिरता वाढवणार असल्याचे म्हटले आहे.  चीन सुरुवातीपासूनच तैवानला आपला हिस्सा सांगत आहे. तर, तैवान स्वत: ला एक स्वतंत्र देश मानतो आणि जगातील देशांचा दृष्टीकोनही वेगळा आहे.


तैवान खाडीचे काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण चीन समुद्रालगत तैवानच्या खाडीचा 110 मैलांचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदेश मानला जातो. पण चीन यावर आपला दावा करत आहे. चीनच्या या दाव्याला अमेरिका सतत आव्हान देत आहे. या भागात, तो तैवानच्या खाडीत अमेरिकी नौदलाचे आणखी एक युद्धनौका या ठिकाणी पाठवली आहे. त्यामुळे चीनचा तिळपापड  झाला आहे. याला चीनने तीव्र विरोध केला आहे.


युएसएस रसेल यांनी तैवानच्या खाडीत मारली चक्कर


तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अमेरिकन युद्धनौका तैवानच्या खाडीत नेहमीच गस्त घालत असते. ते दक्षिण चीन समुद्रात नियमित गस्त घालण्यासाठी आले होते. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार तैवानच्या सैन्य दलाने जहाजांना पूर्ण सुरक्षा पुरविली. Arleigh Burke-Class Destroyer यूएसएस रसेल असे नाव आहे. हे अनेकदा तैवानसह एकत्र गस्त घालते.


चीन-तैवानमध्ये तणाव वाढतोय


चीन तैवानला आपला हिस्सा मानतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चीन विविध युक्त्यांचा अवलंब करीत आहे. इथले सरकारही सैन्याच्या वापरावर भर देत आहे. तैवानचीही स्वतःची सेना आहे. याला अमेरिकेचा पाठिंबा देखील आहे. तैवानमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची सत्ता आल्यापासून चीनशी त्याचे संबंध बिघडू लागले आहेत. एवढेच नव्हे तर तैवान अमेरिकेकडून सातत्याने शस्त्रेही विकत घेत आहे. त्याचवेळी अलीकडच्या काळात चिनी हवाई दलाने तैवानच्या भागात घुसखोरी केली होती.