चीनने बायोवेपन प्रमाणे केला कोरोना व्हायरसचा वापर; आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
वूहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस पसरण्याबाबत चीननं पारदर्शीपणे खुलासा करावा असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. कोरोनाचा प्रासार हा वूहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे नवे पुरवे हाती लागल्याची महिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी दिली होती .
Covid Origin: चीनपासून सुरू झालेली कोरोना व्हायरसची दहशत संपूर्ण देशभरात पसरली होती. कोरोना संसर्गामुळे जगभारात लॉकडाऊन लागला होता. जगभरात लाखो नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चीनने कोरोना व्हायरस तयार केल्याचा आरोप केला नेहमीच केला जातो. मात्र, चीन कडून हे आरोप फेटाळले जातात. आता वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनीच चीनचा खरा चेहरा जगासमोर उघड केला आहे. चीननेच मुद्दाम कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरवला. चीनने बायोवेपन (Bioweapon) प्रमाणे कोरोना व्हायरसचा वापर केल्याचा खळबळजनक खुलासा वुहानच्या इन्स्टिट्यूटच्या संशोधकाने केला आहे. कोरोना व्हायरसच्या या बायोवेपनच्या माध्यमातून जगभारत जैविक आतंकवाद (Biological Terrorism) पसरवून दहशत निर्माण करण्याचा चीनचा कट होता असा दावा देखील या संशोधकाने केला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कोरोना व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेत तयार केल्याचा दावा केला होता. त्यावेळी ट्रम्प यांचा हा दावा कुणीही गांभिर्याने घेतला नाही. आता मात्र, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या एका संशोधकाने केलेल्या दाव्यामुळे जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. चीनने कोरोना व्हायरस 'बायोवेपन' म्हणून तयार केलाचा खळबळ जनक दावा या संशोधकाने केला आहे.
वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये संशोधक म्हणून काम करणाऱ्या चाओ शाओ यांनी हा खुलासा केला आहे. शाओ यांनी जेनिफर झेंग यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे. जेनिफर झांग या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाच्या सदस्य आहेत. चीन आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी (CCP) बद्दल अचूक माहिती देणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे.
कसे पसरवला कोरोना व्हायरस, वुहान इन्स्टिट्यूटच्या संशोधकाने नेमका काय खुलासा केलाय?
चाओ शाओ यांनी कोरोना व्हायरसचे चार स्ट्रेन दिले होते. या चार पैकी कोणता स्ट्रेन सर्वात घातक आहे हे तपासण्याचे आदेश चाओ शाओ यांच्या टीमला देण्यात आले होते. मुलाखतीत त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. 26 मिनिटांच्या या मुलखतीत चाओ शाओ यांनी कोरोना व्हायरस जगभरात कसा परसला याचा देखील खुलासा केला आहे. 2019 मध्ये वुहानमध्ये जेव्हा मिलिटरी वर्ल्ड गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनचे संशोधन करणाऱ्या त्यांच्या ग्रुपमधील काही वायरोलॉजिस्ट अचानक गायब झाले. या वायरोलॉजिस्टचा शोध घेतला असता खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले विविध देशांचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये या वायरोलॉजिस्टना आरोग्य आणि स्वच्छता तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. हॉटेलमध्ये आरोग्य आणि स्वच्छता तपासण्यासाठी या वायरोलॉजिस्ट अर्थता संशोधकांना पाठव्याची गरज काय? असा प्रश्न चाओ शाओ यांनी उपस्थित केला. हे संशोधक कोरोना व्हायरस पसरवण्यासाठीच या हॉटेलमध्ये गेले होते असा दावा चाओ शाओ यांनी केला आहे.