China Hospital Corona Video Viral :  चीनमध्ये पुन्हा (Coronavirus in China) एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. कोविड-19 (Covid-19) निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचं ज्या प्रकारे थैमान सुरू आहे, त्यावरुन 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर याचदरम्यान चीमनधील रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा कठीण परिस्थितीत चीनमध्ये औषधांचा साठा जवळपास संपत आलाय. अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत. अंत्यसंस्कारांसाठी अक्षरशः रांगा लागल्यायत. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जमिनीवर झोपवण्याची वेळ आलीय. चीनमधल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये हाहाकार माजलाय. शांघाईमधल्या शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आलेत. 



रूग्णालयातील रूग्णांचा भयानक व्हिडीओ व्हायरल


अशातच चीनमधल्या रूग्णालातील एक व्हिडीओ समोर आला आहे. चोंगकिंगच्या एका रूग्णालयातील आपात्कालीन रूमचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये रूग्णांना जमिनीवर झोपल्याचं दृदयद्रावक चित्र दिसून येतंय. एकीकडे रूग्णालयाच्या सर्व खाटांवर रूग्ण आहेत तर दुसरीकडे डॉक्टर जमिनीवर झोपलेल्या रूग्णांना सीपीआर देतानाचं चित्र आहे. याशिवाय अनेक रूग्ण वेंटीलेटर्सवर असल्याचंही पाहायला मिळतंय. 


ड्युटीवर असलेले काही डॉक्टर बेशुद्ध


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अजून एक व्हिडीओनुसार, एक डॉक्टर रूग्णांना तपासत असताना अचानक बेशुद्ध होतो. ही सगळी दृश्य चीनची एकूण परिस्थिती दर्शवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरटाईम केल्यामुळे डॉक्टर बेशुद्ध झालेत. चीनसह अमेरिका, जापान, ब्राझील, जर्मनी आणि फ्रान्समध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेत. या देशांमध्ये काल एका दिवसात हजार लोकांचा मृत्यू झालाय.



भीतीदायक आकडे (20 डिसेंबर रोजी मृत्यू)


  • अमेरिका- 308

  • जापान- 231

  • ब्राझील- 216

  • जर्मनी- 201

  • फ्रान्स- 130


भारताची आरोग्ययंत्रणा अलर्टवर


चीन जपान अमेरिकेत कोरोना संकट पुन्हा वाढतंय. त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत मॅरेथॉन बैठक सुरू आहे. त्यात मास्क सक्तीचा  (Masks Mandatory) निर्णय होण्याची शक्यता आहे. ख्रिसमस आणि नवं वर्ष स्वागत लक्षात घेता ही नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. देशात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती लागू होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. सार्वजनिक ठिकाणांसह रेल्वे प्रवासातही मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे.