मुंबई : दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) आक्रमक कारवाई करणार्‍या चीनने (China)  आता भारतीय सीमेवरीलही (Indian Border) आपल्या 'नापाक' कृत्याची पुनरावृत्ती करण्यास सुरवात केली आहे. चीनने छुप्या मार्गाने आपल्या पश्चिम सीमेवर हवाई दलाच्या कारवाया अतिशय वेगात वाढवण्यास सुरवात केली आहे. भारतासोबत तणावपूर्ण संबंध असताना चीनने सीमारेषा मजबूत करण्याची सुरवात केली आहे. 'ड्रॅगन' ने आता भारतीय सीमेजवळील विमानतळांवर अणुबॉम्बर्समध्ये प्राणघातक क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. (China increased air power on Indian border nuclear bomber modern missiles what intention of Dragon)
 
अमेरिकन संरक्षण वेबसाईट द ड्राइव्हने इंटेलिजेंस तज्ञांच्या मदतीने म्हटलंय की,  पूर्व लद्दाखमधील (Eastern Ladakh) गॅलवान व्हॅलीतील हिंसाचारानंतर (Galwan Valley Violence) चीन आणि भारताच्या लष्करांमध्ये वळण आलंय. विशेषत: चीनने आता आपल्या विमानतळांवर वेगाने गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे. गेल्या एक वर्षात चीनने भारतीय सीमेवरील अनपेक्षितपणे विमान वाहतुकीचे कार्यक्रम तीव्र केले आहेत. या व्यतिरिक्त चीनने आपली ताकद वाढवली आहे.
 
सॅटेलाईट फोटोच्या माध्यामातून, चीन अरुणाचल प्रदेश सीमेजवळ (Arunachal Pradesh)  हेलिपॅड आणि रेल्वे लाईन बनवत आहे. रिपोर्टनुसार, चीनकडून केली जाणारी ही तयारी बचावात्मक नाही. तर चीनवर त्यांची ही रणनिती उलटी फिरु शकते. संरक्षण तज्ञांनुसार, चीनने तिबेट आणि इतर प्रांतात पश्चिम सीमेसह सैन्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वेगाने वाढ केली आहे. यात चीनने एअर पावर वाढवण्यावर भर देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2017 मध्ये डोकलाममध्ये झालेल्या गतिरोधानंतर चीनच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरापासून याने नवीन लष्करी तळ तयार केले आहेत. यासह, विद्यमान सैन्य तळांचे वेगाने आधुनिक सोयी-सुविधांसह बदल करण्यात आले आहेत. 


चीनने आपल्या पश्चिम प्रांतांत नवीन रनवेची निर्मिती केली आहे. याशिवाय,  बीजिंगचे लक्ष चीनच्या हवाई दलाचे  (Chinese Air Force) आकार वाढविण्यावर आहे. अशा अनेक संरचना तयार केल्या आहेत, ज्या भारताच्या हवाई हल्ल्यादरम्यान नष्ट करणे सोपे होणार नाही. चीनने आता भारतीय सीमेसंदर्भातील तयारी हाय अलर्टवर ठेवली आहे.


तज्ज्ञांनी सांगितले की, भारत आणि चीनमधील वाढत्या भौगोलिक तणावाच्या दरम्यान तिबेट आणि झिनजियांगमधील पायाभूत सुविधांचा अचानक विकास झाला आहे. पश्चिमेकडील सीमेवर चीन किती शक्ती एकत्रित करते, याचा अंदाज या क्षणी बांधता येऊ शकत नाही.  या लष्करी तळांवर काम वेगाने सुरू आहे.


संबंधित बातम्या : 


गलवानच्या विरपुत्रांसाठी गाण्यातून श्रद्धांजली, हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू


MICROSOFT अध्यक्षपदी भारतीय वंशाचे सत्या नडेला