चीनचा काही नेम नाही; कोट्यवधी रुपये खर्चून पृथ्वीवर आणणार चंद्राचा तुकडा, काय आहे मेगाप्लॅन?
China Magnetic Space Launcher Latest News: अवकाश क्षेत्रामध्ये नासा आणि इस्रोला तगडी टक्क देणाऱ्या चीनमधील अंतराळ संशोधन संस्थांनी आता एक मोठं पाऊल उचललं आहे.
China Magnetic Space Launcher Latest News: अवकाशात घडणाऱ्या असंख्य घडामोडी पृथ्वीपर्यंत पोहोचतात आणि प्रत्येक वेळी सामान्यांना थक्क करून जातात. अवकाश, आकाशगंगा, ग्रहतारे आणि त्यांच्या हालचाली, यासह अवकाशातील प्रत्येक गोष्टीप्रती मागील काही काळापासून कुतूहलात बरीच भर पडली आहे. विविध देशातील अंतराळसंशोधन संस्थांकडून केलं जाणारं संशोधन आणि त्यांच्या निरीक्षणपण अहवालांमुळं हा बदल दिसू लागला आहे. अशाच या अंतराळातील सर्वांसाठीच आकर्षणाचा विषय असणाऱ्या चंद्रावर आता चीनचा डोळा असल्याचं पाहायला मिळत आहे.
तिथं नासा आणि इस्रो विविध मोहिमांच्या माध्यमातून चंद्र आणि त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेक संकल्पनांची उकल केली जात असतानाच आता चीननं मात्र कोणालाही सुगावा लागू न देता एक मेगाप्लॅन तयार केल्याचं म्हटलं जात आहे. अवकाश क्षेत्रामध्ये अनेक देशांना पिछाडीवर टाकणाऱ्या चीननं आता एक मोठी मोहिम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत चीनचे अंतराळवीर चंद्राचा तुकडाच पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्नशील असतील.
उपलब्ध माहितीनुसार चीनच्या अंतराळसंस्थेसाठी काम करणारे हे वैज्ञानिक आणि अभ्यासक सध्या चंद्रावर असणाऱ्ये हेलियमचा काही भाग थेट पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी मॅग्नेटीक स्पेस लाँचर अर्थात चुंबकीय घटकांवर काम करणाऱ्या यानाची निर्मिती करण्याचं कामही सुरी केलं असून, यासाठी जवळपास तब्बल 1.5 लाख कोटी रुपये इतका खर्च करण्याची तयारीसुद्धा दाखवली आहे.
हेसुद्धा वाचा : 'ती तिथं...' सुनिता विलियम्स यांच्या अंतराळातील लांबलेल्या मुक्कामावर पती, आईनं सोडलं मौन
माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार चीनचं हे यान अशा पद्धतीनं तयार केलं जाणार आहे, की त्या माध्यमातून चंद्रावर असणारं हेलियम 3 आणि इतर मौल्यवान घटक सहजपणे पृथ्वीवर पाठवता येतील. या यानाचं वजन साधारण 80 मेट्रिक इतकं असून, त्याच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठावर असणाऱ्या आयसोटाईप हेलियम 3 ला काढण्यासाठी त्याची मदत होणार आहे.
चीनचं हे यान चंद्राच्या पृष्ठावर किमान 20 वर्षे सक्रिय असेल अशाच पद्धतीनं त्याची आखणी आणि निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय हे यान पूर्णपणे वीजेवर चालणारं असून, आण्विक आणि सौरउर्जेच्या माध्यमातून मिळवलेल्या वीजेवर ते कार्यरत राहील. चंद्रावरून हे यान वाऱ्याचा वेग आणि गुरुत्वाकर्षणाच्या मदतीनं अंतराळातील या गोष्टी पृथ्वीच्या दिशेनं भिरकावणार आहे. त्यामुळं या मोहिमेवर अनेकांचं लक्ष असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय.
अतिशय महत्त्वाकांक्षी आणि अवकाश क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या या मोहिमेची तारीख अद्यापही चीननं जाहीर केलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार या मोहिमेमध्ये चीन आणि रशिया एकत्र काम करू शकतात, अर्थात ही मोहिम चीन आणि रशिया यांच्या संयुक्त कार्यक्रमाचाच एक भाग समजला जात आहे.