नवी दिल्ली : सुटे पैसे साठवण्याची अनेकांना सवय असते. मात्र तुम्ही कधी इतकी चिल्लर साठवली आहे का, की त्यातून तुम्ही कार वगैरे खरेदी करू शकाल ? नक्कीच नाही.


कारचे डाऊन पेमेंट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण चीनमधल्या एका व्यक्तीने आयुष्यभर साठवलेल्या चिल्लरमधून चक्क बीएमडब्ल्यूचं डाऊन पेमेंट केलं आहे. लाखाच्या घरात या कारचे डाऊन पेमेंट होते. मात्र ही रक्कम चिल्लर स्वरूपात मोजताना शोरुममधील कर्मचाऱ्यांच्या अक्षरश: नाकी नऊ आले.


१० खोके आणि २-३ तास


‘पिअर व्हिडिओ’नं दिलेल्या माहितीनुसार चीनमधल्या फुजिआन प्रांतातील एका व्यावसायिकानं जवळपास ३८ लाखांची बीएमडब्ल्यू खरेदी केली. याचं डाऊन पेमेंट सुमारे साडेसहा लाखांहून अधिकच होते. हे पेमेंट त्याने चिल्लर देऊन केले. ही सहा लाखांची चिल्लर त्याने १० खोक्यांमध्ये भरून आणली होती आणि ती मोजायला शोरुमधल्या कर्मचाऱ्यांना चक्क २-३ तास लागले.