नवी दिल्ली : भारत आणि जपानमधली वाढती मैत्री पाहून चीनचा तीळपापड झाला आहे. दोन देशांमध्ये भागीदारी असावी पण गटबाजी असू नये, असं वक्तव्य चीनच्या परदेश मंत्रायलयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी केलं आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंच्या भारत दौऱ्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चुनयिंग यांनी हे उत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी अशा या प्रकल्पासाठी १ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. तर, हा संपूर्ण प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.


भूमिपूजनाच्या या कार्यक्रमामध्ये बोलताना शिंजो आबे यांनी अप्रत्यक्षरित्या चीन आणि पाकिस्तानवर निशाणा साधला. जपान हा भारताच्या बाजूनं आहे. शक्ती दाखवून सीमा बदल करण्याचा आम्ही विरोध करतो अशा शब्दात डोकलामच्या मुद्द्यावर शिंजो आबेंनी चीनला सुनावलं.