नवी दिल्ली : डोकलाम सीमाप्रश्नी दोन ते दीड महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन देशांत तणाव वाढत आहे. काही दिवसांपासून चीन म्हटलेय, भारताने सीमेवर सैन्य हटविले तर चर्चेची बोलणी होतील. मात्र, भारताने चर्चा यशस्वी झाली तर सीमेवरुन सैन्य हटविले जाईल. दरम्यान, या वादावर चीनच्या मीडियाने इशारा दिलाय. दोन आठवड्यात भारताने डोकलाममधून सैनिक हटविले नाही तर चीन हल्ला करु शकेल. तशा हलचाली चीनने सुरु केल्यात.


१६ जूनपासून सुरु आहे विरोध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या खास सूत्रांकडून सांगण्यात आलेय. डोकलाममधील वादामुळे सीमेवर भारतीय जवान कायम आहेत. त्यामुळे चीन छोटा हल्ला करण्याची तयारी करत आहे. सिक्किम सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात १६ जूनपासून विरोध सुरु आहे. हा विरोध सुरु झालाय त्याला कारणही तसेच आहे. चीन सैनिकांनी भूतानमध्ये एका रस्त्याचे काम सुरु केले.


भूतानने केला होता विरोध


भूताने चीनच्या या पावलाबाबत विरोध केला होता. हा त्यांचा भाग आहे, असे भूतानने म्हटले. त्याचवेळी बीजिंगवर आरोप केला, की केलेल्या कराराचा हा भंग आहे. सीमावाद सोडविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. तर भारताने भूतानमध्ये बांधण्यात आलेला रस्ता हा एकतर्फी कारवाईचा भाग आहे. या रस्त्याच्या माध्यमातून चीन भारतातील पूर्वेकडी राज्यात शिरकाव करेल. हा रस्ता या राज्यात संपविण्याची  शक्यता आहे.


चीन जास्तकाळ हा तणाव लांबवू शकत नाही!


शांघाय अकादमी ऑफ सोशल सायंसेजमध्ये इंस्टीट्युट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे अभ्यासक हू झियोंग यांच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, चीन डोकलाममध्ये आपले सैन्य आणि भारतातील सैन्य एकमेकांसमोर जास्तकाळ ठेवू नाही. भारतीय सैनिकांना दोन आठवड्यांच्या आत बाहेर काढण्यासाठी एका लहान पातळीवर लष्करी मोहीम चालवू शकतो. चीन ही कारवाई करण्याआधी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती देईल.


दोघांमधील विरोध दूर करणे गरजेचे


भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे की, हा मुद्दा शांतीपूर्ण पद्धतीने सोडवणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी दोघांनी आपल्या सैनिकांना हटवावे आणि मग चर्चा करा. सुषमा यांनी गुरुवारी पुन्हा म्हटले हे युद्ध नाही. भारतीय मतभेदांचे निराकरण करण्यासाठी चीनशी बोलत आहे आणि त्यानी धीराने ही बाब घेतली पाहिजे. सुषमा यांच्या मंत्रिमंडळाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी शुक्रवारी येथे सांगितले की, भारत डोकलाम मुद्यावर भूतानशी  संपर्क साधून आहे.