नवी दिल्ली : चीनमध्ये क्रिसमसच्या आधीच एका विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वेस्टर्न सिव्हिलीयझेशनपासून दूर ठेवण्यासाठी ख्रिसमसवर बंदी घातली आहे. विद्यापीठाने म्हटलं की, अनेक विद्यार्थी ख्रिसमसच्या बाबतीत डोळे बंद करुन उत्साह साजरा करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या पूर्वेकडील राज्य लिआओनिंगमधील शेनयांग फार्मास्युटिकल विद्यापीठाने परिसरात विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत की, ख्रिसमस सारख्या पाश्चिमात्य सण साजरे करु नयेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनच्या कम्युनिस्ट युवा लीगच्या युवकांनी म्हटलं की, 'हा निर्णय तरुण पिढीमध्ये सांस्कृतिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी घेतला गेला आहे.'


एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ही नोटीस विद्यार्थ्यांना देण्यात आली. युवा लीगने म्हटलं की, तरुण डोळे बंद करुन पाश्चिमात्य सण साजरे करतात. चीनमध्ये हे पहिल्यांदा झालेलं नाही. चीनमध्ये याआधी देखील शैक्षणिक संस्थेने ख्रिसमसवर बंदी घातली आहे. चीनमध्ये असे समजले जाते की पाश्चिमात्य किंवा परदेशी संस्कृती चीनच्या प्राचीन संस्कृतीला नष्ट करत आहे.