नवी दिल्ली : कोरोना सध्या जगासमोर सर्वात मोठे आव्हान बनले आहे. चीनपासून सुरु झालेला कोरोना आता संपूर्ण जगात आपले पाय पसरवून बसला आहे. या विषयावर जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी बैठक बोलावली तेव्हा अमेरिका आणि चीन समोरासमोर आले. आत्तापर्यंत अमेरिका यूएन-डब्ल्यूएचओच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत होता तर चीन या दोघांचं कौतुक करत होता.


या बैठकीत चीनने काय म्हटले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, कोरोना विषाणूच्या मुद्यावर, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने गुरुवारी एक मेगा बैठक आयोजित केली. चीनने येथे झालेल्या बैठकीत सांगितले की कोरोना व्हायरस हे एक जागतिक आव्हान आहे, त्यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेल्या नेतृत्वाचे चीन कौतुक करतो.


चीनने म्हटलं की, कोरोना व्हायरस हा प्रत्येकासाठी धोका आहे, यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन काम करावे लागेल. चीननेही संयुक्त राष्ट्रांच्या आवाहनाचे समर्थन केले आहे, ज्यामध्ये सर्व देशांना त्यांचे मतभेद विसरून कोविड - 19 विरुद्ध लढा देण्यास सांगितले आहे. चीनने येथे म्हटले आहे की, जेव्हा कोरोना विषाणूचे संकट चीनमध्ये होते तेव्हा अनेक देशांनी त्यांना मदत केली. आता ते 100 हून अधिक देशांना मदत करीत आहेत.


बैठकीत अमेरिकेने काय म्हटले?


पुन्हा एकदा अमेरिकेने या बैठकीत चीनच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले. अमेरिकेने म्हटलं की, या संकटाच्या वेळी पारदर्शकता ठेवण्याची गरज आहे. जेणेकरून प्रत्येकाला सत्य कळेल. अमेरिकेने असा दावा केला की तो सध्या जगातील विविध देशांच्या सहकार्याने कोरोना विषाणूविरूद्ध लढा देत आहे.


चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकत्रितपणे कोरोना विषाणूचे सत्य लपवून ठेवले होते, ज्याचा सामना जग करीत आहे. या बैठकीतही अमेरिकेने याचा पुनरुच्चार केला आणि असे आवाहन केले की प्रत्येक देशाने सत्याने पुढे येण्याची गरज आहे.


बहुतेक देशांनी पाठिंबा दर्शविलेल्या या बैठकीत संयुक्त राष्ट्रांनी जागतिक युद्धबंदीचे आवाहन केले. फ्रान्स, व्हिएतनाम, अमेरिका, चीन यासह अनेक देशांनी युद्धबंदीचे औचित्य साधून कोरोना विषाणूचे वर्णन यावेळी सर्वात मोठे आव्हान म्हणून केले.