बीजिंग : चीनच्या एक पक्षीय राजकारणामध्ये सगळ्यात मोठा बदल झाला आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिंगपिंग यांच्या दोन कार्यकाळाची अनिवार्यता समाप्त झाली आहे. यामुळे आता जिंगपिंग चीनचे आजीवन राष्ट्रपती राहु शकतात. ६४ वर्षांचे जिंगपिंग या महिन्यात दुसऱ्यांदा ५ वर्षांच्या कार्यकाळाला सुरुवात करतील. जिंगपिंग हे चीनमधले सध्याच्या काही दशकांमधले सगळ्यात शक्तीशाली नेते आहेत. सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन(सीपीसी)चे जिंगपिंग नेते आहेत. तसंच ते सेनाप्रमुखही आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संस्थापक अध्यक्ष माओ-त्से-तुंग यांच्यानंतर जिंगपिंग पहिले असे नेते आहेत जे आजीवन सत्तेमध्ये असू शकतात. नॅशनल पिपल्स काँग्रेसनं(एनपीसी) रबर स्टॅम्प म्हणून असलेली आपली प्रतिमा कायम ठेवली आहे. सरकारच्या मतानुसार मतदान करुन सीपीसीनं जिंगपिंग यांना आजीवन राष्ट्रपती बनवण्यासाठी मदत केली.


चीनच्या घटनेमध्ये बदल


जिंगपिंग यांना आजीवन राष्ट्रपती ठेवण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली. याआधी चीनचे राष्ट्रपती दोन वेळा राष्ट्रपतीपद भुषवू शकत होते. चीनच्या संसदेमध्ये दोन तृतियांश बहुमतानं जिंगपिंग यांना आजीवन राष्ट्रपती बनवण्याचा ठराव संमत करण्यात आला.


घटना दुरुस्तीच्या बाजूनं २,९५८ खासदारांनी तर दोघांनी विरोधात मतदान केलं. तर ३ खासदार अनुपस्थित होते. विरोधामध्ये दिलेली मतं ही सरकारच्या इशाऱ्यावरूनच देण्यात आली होती. विविधता दाखवण्यासाठी सरकारनं या दोघांना विरोधात मत द्यायला सांगितलं होतं.


भारताची चिंता वाढणार?


जिंगपिंग हे आजीवन चीनचे राष्ट्रपती राहिल्यामुळे भारताची चिंता वाढू शकते. जिंगपिंग राष्ट्रपती असतानाच मागच्या वर्षी ७३ दिवस डोकलामध्ये भारत-चीनमध्ये तणाव वाढला होता.