नवी दिल्ली : मागील दोन वर्षात संपूर्ण जगावर कोरोना(Corona) महामारीचे सावट होते. आता कुठे सर्व देश कोरोनाच्या दहशतीतून सावरत आहेत. चीनच्या(China) वुहान(Wuhan) शहरातून कोरोनाचा जगभर प्रसार झाल्याच्या दावा केला जात होता. कोराना काळात चीनमुळे संपूर्ण जगच टेन्शनमध्ये आले होते. आता पुन्हा एकदा चीनने संपूर्ण जगाला धडकी भरवली आहे. चीनच्या एका चुकीमुळे अनेक देशांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. तर, अनेक देशांमधील एअर पोर्ट(Airport) बंद करण्यात आले आहेत.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनचे एक अनियंत्रीत रॉकेट पृथ्वीच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. चीनचे हे अनियंत्रीत रॉकेट कोणत्याही क्षणी आणि कुठेही पडू शकते. शास्त्रज्ञांनी या संदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे.
चीनच्या या अनियंत्रीत रॉकेटचे वजन तब्बल 23 टन इतके आहे.  हे रॉकेट कोणत्याही क्षणी कोसळू शकते. कोसळलेल्या रॉकेटच्या अवशेषमुळे मोठी हानी होवू शकते असा धोक्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.


चीनमुळे स्पेनला याचा सर्वाधिक धोका 


या अनियंत्रीत रॉकेटमुळे युरोपातील काही देशांना धोका निर्माण झाला आहे. विशेषत: स्पेनला याचा सर्वाधिक धोका असल्याचे समजते. खबदारीचा उपाय म्हणून स्पेनने अनेक विमानतळांवरील सेवा बंद केली आहे. यामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 


मेंगशान हेनान प्रांतातील दक्षिण बेटाजवळ असलेल्या वेनचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून या चीनी रॉकेटचे प्रक्षेपण झाले. सोमवारी दुपारी हे रॉकेट अवकाशात झेपावले. अवकाशात झेप घेतल्यांनंतर काही वेळातच अवकाश केंद्राचा या रॉकेटशी संपर्क तुटला. हे रॉकेट अनियंत्रीत झाले.


चीनचे रॉकेट अनियंत्रीत


साधारण 5 नोव्हेंबर रोजी हे रॉकेट पृथ्वीच्या वातावरणात कोसळू शकते. यामुळे या रॉकेटचे अवशेष धोकादायक ठरू शकतात. कोसळणाऱ्या या रॉकेटचा ढिगारा पृथ्वीवर कुठेही कोसळू शकतो. 


यापूर्वी देखील चीनचे एक रॉकेट अनियंत्रीत झाले होते. चिनी रॉकेट लाँग मार्च 5B देखील अशाच प्रकारे अनियंत्रीत झाले होते. यावेळी या रॉकेटचे अवशेष मलेशिया आणि आसपासच्या देशांमध्ये कोसळले होते.