नवी दिल्ली : देशाच्या राजधानीतून अर्थात दिल्लीतून एक असा फोटो समोर आला आहे. जो पाहून चीनच्या तोंडचं पाणी पळालं आहे. नेमकं काय आहे या फोटोत, ज्यामुळे चीनमध्ये खळबळ उडालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाच तो फोटो...जो पाहून चीनमध्ये टेन्शन वाढलंय. या फोटोत एका बाजुला आहेत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि दुसऱ्या बाजुला अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड जेम्स ऑस्टिन...दोघांच्या चेह-यावर भेटीचा आनंद स्पष्टपणे दिसतोय...या भेटीतून भारत-अमेरिका मैत्रीच्या नव्या पर्वाचे संकेत मिळतायेत. 


 सगळ्यात महत्वाचं म्हणजे या एका फोटोनं चीनमध्ये खळबळ माजलीय. चीनच्या राजधानीत अस्वस्थता वाढलीय.


 नवी दिल्ली ते बीजिंग हे अंतर जवळपास 3 हजार 780 कि.मी. इतकं आहे. मात्र एव्हढ्या लांबूनही चीन , भारत आणि अमेरिकेतल्या मैत्रीच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. 


 आता या भेटीत राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांना नेमकं काय सांगितलं. अमेरिकेचे संरक्षमंत्री ऑस्टिन यांनी राजनाथ सिंहांशी कोणत्या विषयावर चर्चा केली? संरक्षणाच्या मुद्द्यावर भारत-अमेरिकेत कोणता समझौता झाला? या प्रत्येक गोष्टीवर चीन लक्ष ठेवून आहे. कारण भारत आणि अमेरिका एकत्र येणं चीनला परवडण्याजोगं नाही.