Viral Video : भारत आणि चीन (India VS China) यांच्यातील संबंध गेल्या अनेक दिवसांपासून ताणले गेले आहेत. सीमेवरील तणावापासून ते चिनी वस्तूंपर्यंत भारतीय लोक गेल्या काही दिवसांपासून चीनचा कडाडून विरोध करताना दिसत आहेत. अशातच चिनी नागरिकांकडूनही भारतीयांवर टीका केली जात आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंगापूरमधील (Singapore) एका चिनी कॅब चालकाने (Cab Driver) महिला आणि तिच्या मुलीला शिवीगाळ केली आहे. चीनी कॅब ड्रायव्हरने आई आणि मुलीला भारतीय समजून गैरवर्तन केले होते. व्हिडीओ समोर आल्यानंतर आता प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक चीनी कॅब ड्रायव्हर एका महिलेवर वांशिक टिप्पणी करताना दिसत आहे. पत्त्यावरून आणि चुकीच्या मार्गावरून दोघांमध्ये वाद सुरू होतो. त्यानंतर चिनी कॅब चालकाने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सिंगापूरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.


महिलेने तिला जायच्या ठिकाणाची चुकीची माहिती दिल्याने कॅब चालकाला राग आला. त्यानंतर कॅब चालकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावर महिलेने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली. जेनेल होडेन असे या महिलेचे नाव आहे. आपण भारतीय आहोत असे समजून चालकाने गैरवर्तन केले, जेनेल यांनी सांगितले. या प्रवासात जेनेल यांच्यासोबत नऊ वर्षांची मुलगी देखील होती. शनिवारी घडलेल्या घटनेबाबत 46 वर्षीय जेनेला हॉइडेन म्हणाल्या, 'कॅब ड्रायव्हरने मला म्हटलं की, 'तू भारतीय आहेस, तू मूर्ख आहेस.'


द स्ट्रेट्स टाईम्सच्या वृत्तानुसार, जेनेल यांनी मोबाईलवर चालकाशी झालेल्या जोरदार वादाचे रेकॉर्डिंग केले होते. जेनेला म्हणाल्या की त्यांनी दुपारी दोनच्या सुमारास कॅब बुक केली होती आणि मेट्रोच्या बांधकामामुळे मार्गाचा एक भाग बंद होता. रस्ता अडवण्यात आल्याने कॅब चालक संतप्त झाल्याचे जेनेलने सांगितले. 'ड्रायव्हर माझ्यावर ओरडू लागला आणि म्हणाला की मी त्याला चुकीचा पत्ता आणि चुकीचा मार्ग सांगितला आहे. ड्रायव्हर म्हणाला तू भारतीय आहेस, मी चिनी आहे. तू खूप वाईट आहेस,' असे जेनेल म्हणाली.


व्हायरल व्हिडीओमध्ये कॅब चालक 'तुम्ही भारतीय आहात... तुम्ही मूर्ख आहात, मी चिनी आहे, लोकांना माहित आहे की तुम्ही भारतीय आहात, मी चायनीज आहे, तुम्ही लोक खूप वाईट ग्राहक आहात,' असे म्हणताना दिसत आहे. त्यावर जेनेलने, मी भारतीय नाही. मी सिंगापूर युरेशियन आहे, असे सांगितले. 


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, कॅब चालक इथेच थांबला नाही, त्याने जेनेलच्या मुलीवरही कमेंट केली. कॅब चालकाने मुलीबद्दल त्याच्या तुटक्या इंग्रजीत बोलून टीका केली. ड्रायव्हर म्हणाला की, 'तुमची मुलगी 1.35 मीटरपेक्षा कमी उंच आहे. माझ्याशी वाद घालू नका.'