Forcing To Marry Disorder: `मुलगा Girlfriend ला घरी घेऊन येत नाही` म्हणून `आजारी` पडली आई! अजब आजार जगभरात चर्चा
Chinese Women Forcing Son To Marry Disorder: सोशल मीडियावर या मुलाचा आणि आईचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओवर हजारो कमेंट्स आल्या आहेत.
Chinese Women Forcing Son To Marry Disorder: बाळा, लग्नाचं काय ते बघ अजून किती दिवस असा एकटा राहणार. वय वाढत आहे. योग्य वयात लग्न केलेलं बरं असं वयाची पंचवीशी ओलांडलेल्या व्यक्तींना वारंवार ऐकावं लागतं. अनेकदा आई-वडील किंवा नातेवाईकांकडूनच ही वाक्य ऐकायला मिळतात. अशाप्रकारचे सल्ले हे सामान्यपणे ऐकलायला मिळतीलच असं लग्नाच्या वयाचे तरुणही गृहित धरतात. तर काहीजण हे सल्ले एका कानाने ऐकून दुसऱ्या सोडून देतात. मात्र यासंदर्भातील एक आजरही आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. चीनमध्ये खरोखर असा प्रकार समोर आला आहे. एक महिला आपल्या मुलाकडे लग्न करण्यासाठी वारंवार विचारणा करत होती. आता डॉक्टरांनी या महिलेला लग्न करण्यासाठी दबाव टाकण्याचा आजार झाला आहे असं म्हटलं आहे. या आजाराला फोर्स टू मॅरी डिसॉर्डर (force to marry disorder) असं म्हणतात.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण चीनमधील हेनान प्रांतातील आहे. येथील 38 वर्षीय वांग अडनाव असलेला तरुण त्याच्या गर्लफ्रेण्डला कधीच आपल्या आईला भेटवण्यासाठी घरी न्यायचा नाही. मात्र मुलाने गर्लफ्रेण्डला घरी आणावं आणि हीच आपली सून व्हावी अशी या महिलेची अपेक्षा होती. या मुलीने आपल्या सर्व नातेवाईकांना भेटावं असं या महिलेला अनेकदा वाटायचं. दर वेळेस नवीन वर्षाच्या काही दिवस आधी ही महिला मुलाला गर्लफ्रेण्डला घरी घेऊन ये असं सांगायची आणि त्यासाठी त्याच्यावर दबाव टाकायची. मात्र मुलाने कधीच या मुलीला घरी आणलं नाही. यामुळे आपल्या मुलाला मानसिक आजार असल्याचं या महिलेला वाटू लागलं. 2020 पासून नवीन वर्षाच्या आधी ही महिला तिच्या मुलाला सायकोथेरपिस्टकडे उपचारासाठी घेऊन जायची. आपल्या मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असं या माहिलेला वाटायचं.
...आणि डॉक्टर म्हणाल तो नाही तुम्ही आजारी आहात
दरवेळेस डॉक्टर वांगची तपासणी करायचे आणि त्यानंतर त्याची प्रकृती ठीक असल्याचं त्याच्या आईला सांगायचे. वांग सामान्य मुलांसारखाच वागायचा. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार वांग आईला बरं वाटावं म्हणून दरवेळेस तिच्याबरोबर रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यायचा. यंदाही चीनमधील नवीन वर्षाच्या आधी म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी वांग आईबरोबर रुग्णालयामध्ये गेला. मात्र यावेळेस डॉक्टरांनी वांगच्या आईला तो आजारी नसून तुम्ही आजारी आहात असं सांगितलं. आपल्या मुलावर लग्नासाठी दाबाव टाकण्याचा मानसिक आजार असल्याचं डॉक्टरांनी वांगच्या आईला सांगितलं.
वांग काय म्हणाला?
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. आया आपल्या मुलांच्या लग्नासाठी एवढ्या उत्सुक का असतात? लग्नासाठी अशाप्रकारे दबाव टाकणं चुकीचं नाही का? व्हिडीओमध्ये वांगने लूनार न्यू इयरला आपण कधीच गर्लफ्रेण्डला घरी आणलं नाही असं सांगताना दिसत आहे. वांगच्या वागण्यामुळे त्याला मानसिक आजार असल्याचं त्याच्या आईला वाटू लागलं. "आईला वाईट वाटू नये म्हणून मी तिच्याबरोबर जात होतो. डॉक्टरांनी सांगितल्यावर तिचा विश्वास बसेल की मला काहीही झालेलं नाही या विचाराने मी दरवेळेस तिच्यासोबत जायचो," असं वांग म्हणाला.
व्हिडीओवर हजारो कमेंट्स
समोर आलेल्या माहितीनुसार वांग एक लोकप्रिय अभिनेता असून तो मागील 10 वर्षांपासून बीजिंगमध्ये काम करत आहे. सध्या तो टेनिस कोच म्हणून काम करतोय. एवढं वय झालं असूनही लग्न का केलं नाही अशा विचारलं असता त्याने मला अजून योग्य पार्टनर मिळालेली नाही असं वांग असतो. आईला झालेल्या या आजारामुळे वांग स्वस्त चिंतेत आहे. मला गावामध्ये 'ओल्ड सिंगल मॅन' नावाने ओळखलं जातं, असं वांग सांगतो. वांगच्या व्हिडीओवर हजारो कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी असा दबाव योग्य नाही असं म्हटलं आहे.