Lockdown मुळे चीनी जनता त्रस्त, घरात कैद लोकांचा ओरडण्याचा व्हिडिओ व्हायरल
China covid 19 update : चीनने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 5 एप्रिलपासून शांघामध्ये लॉकडाऊन केले आहे.
Covid 19 : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चीनमध्ये सध्या 'झिरो कोविड पॉलिसी'चे पालन केले जात आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर शांघायमध्ये कोविडचा फैलाव वाढल्यानंतर सरकारने संपूर्ण शहरात कडक लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान, कठोर कोविड लॉकडाऊनमुळे संतप्त लोकांचे व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात लोक त्यांच्या अपार्टमेंटमध्ये ओरडताना ऐकू येत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर होत आहेत. ज्यामध्ये लोकं स्थानिक अधिकाऱ्यांशी भांडताना दिसतात. अशा कडक लॉकडाऊनचे गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा लोकं देत आहेत.
आपल्या कठोर कोविड धोरणानुसार, चीनने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 5 एप्रिलपासून शांघामध्ये लॉकडाऊन केले आहे. शहरातील 26 कोटी जनता त्यांच्या घरात कैद झाली आहे.
अमेरिकेत राहणारे प्रसिद्ध आरोग्य शास्त्रज्ञ एरिक फीगल-डिंग यांनी शांघायचे काही व्हिडिओ ट्विट केले आहेत. व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी लिहिले की, चीनचे लोकं अपार्टमेंटमधून स्थानिक बोली शांघायमध्ये ओरडत आहेत.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'लॉकडाऊनच्या सातव्या दिवशी शांघायचे रहिवासी त्यांच्या उंच अपार्टमेंटमधून ओरडत आहेत. एक व्यक्ती ओरडून सांगतो की अनेक समस्या येणार आहेत. लोकांना जास्त काळ वेठीस धरून ठेवता येत नाही.
डॉ एरिक यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, लोकांचा राग लवकरच बाहेर येणार आहे.
व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत त्यांनी लिहिले, 'व्हिडिओ पूर्णपणे सत्य आहे. माझ्या सूत्रांनी याची पुष्टी केली आहे. शांघायनी ही स्थानिक बोली आहे. चीनच्या 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी केवळ 140 दशलक्ष चिनी लोक ते बोलतात. मला ही भाषा अवगत आहे कारण माझा जन्म तिथे झाला आहे.
आरोग्य तज्ञांनी सांगितले की शांघायमध्ये कोविड प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि चीनमध्ये ओमिक्रॉनची BA.2 व्हेरिएंट आणखी वाढणार आहे.
शांघायमध्ये कडक लॉकडाऊनमुळे घरात कैद असलेल्या लोकांसाठी अन्नाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात लोक कमी खर्चात जास्त दिवस भाजी साठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
रविवारी शांघायमध्ये 25 हजार कोविड संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत. जगातील इतर शहरांच्या तुलनेत ही प्रकरणे खूपच कमी आहेत, परंतु चीनच्या मते, 2019 मध्ये वुहानमधून कोविडचा उद्रेक झाल्यानंतर, चीन आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक कोविड संसर्गाचा सामना करत आहे.
शांघायच्या रस्त्यावर सामान्य नागरिकांच्या बाहेर पडण्यावर पूर्ण बंदी आहे. केवळ आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, वस्तू वितरीत करणारे लोक आणि विशेष परवानगी असलेल्यांना रस्त्यावर येण्याची परवानगी आहे.