बिजिंग : भारत- चीन या दोन्ही देशांमध्ये काही दिवसांपासून लडाख प्रांतातील सीमाभागात कमालीची तणावपूर्ण परिस्थिती उदभवली आहे. हीच परिस्थिती सोमवारी रात्री टोकाला गेल्याचं समजलं. ज्यामध्ये Galwan Valley गलवान व्हॅली भागात दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त समोर आलं. या चकमकीमध्ये भारतीय लष्करातील दोन जवान आणि एक अधिकारी शहीद झाल्याची माहिती आहे. तर, चीनी सैन्यातील सैनिकांनाही यात प्राणांना मुकावं लागल्याची माहिती चीनकडून देण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नव्हे, तर भारताकडूनच सर्वप्रथम सीमारेषा ओलांडण्यात आल्याचा आरोप करत चीननं याप्रकरणी भारतावर दोष लावला आहे. इतकंच नव्हे, तर भारतानं याप्रकरणी एकतर्फी कारवाई करु नये असा कांगावाही चीन करत असल्याची बाब समोर आहे. 


जाणून घ्या भारत- चीनच्या सैन्यांत चकमक झालेल्या गलवान खोऱ्याविषयी


 


चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे मुख्य संपादक Hu Xijin यांनी या प्रकरणी चीनचंही नुकसान झाल्याची बाब अधोरेखित केली आहे. 'माझ्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार गलवान खोऱ्यातील चकमकीमध्ये चीनचंही नुकसान झालं आहे. मी भारताला एकच सांगू इच्छितो की, तुम्ही या प्रकरणी फार कठोर होण्याची आवश्यकता नाही. चीनच्या संयमी वृत्तीचा गैरसमज करुन घेण्याचीही आवश्यकता नाही', असं ट्विट त्यांनी केलं. 



 


मुख्य म्हणजे इतक्यावरच न थांबता आम्हाला वाद नको आहे, पण वेळ आल्यास आम्ही घाबरणारही नाही, अशा शब्दांत त्यांनी जणू भारताला आव्हान दिलं आहे. तेव्हा आता चीनही दर्पोक्तीची भाषा पाहून भारतीय सैन्य किंवा भारतीय शासनाकडून त्यावर नेंकं काय उत्तर दिलं जाणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.