मुंबई : गोष्ट तशी जुनी. काही वर्षांपूची. साधारण 1960 मधली. जेव्हा माजी कॉल गर्ल ख्रिस्तीना कीलरच्या रूपात इंग्लंडच्या राजकारणात भूकंप आला होता. एका कॉलगर्लमुळे चक्क पंतप्रधानांनाही आपली खूर्ची गमवावी लागली होती. राजकीय इतिहासातली एक रंजक कहाणी म्हणून या घटनेकडे टाकलेला हा एक कटाक्ष...


त्यांच्या चोरट्या प्रेमाचा कोणालाच नव्हता पत्ता. पण.....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ख्रिस्तीना हायात नाही. वयाच्या 75व्या वर्षी लीव्हरच्या आजाराने नुकताच तिचा मृत्यू झाला. पण, आजही इग्लंडच्या राजकीय इतिहासात तिचे नाव घेतले जाते.  एका स्कॅंडलमुळे तिचे नाव इंग्लंडमध्ये रातोरात लोकाच्या ओटांवर आले. हे स्कॅंडल होते, कॅबिनेट मिनिस्टर जॉन प्रोफूमो यांच्यासोबतचे अफेअर. सुरूवातीला या अफेअरचा कोणालाच पत्ता नव्हता. पण, जेव्हा या अफेअरबाबत लोकांना समजले तेव्हा, पंतप्रधानांनाही आपली खूर्ची गमवावी लागली. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा जोरदार प्रसिद्धी मिळाली आणि ख्रिस्तीना आणि जॉन प्रोफूमो यांचे स्कॅंडल जगभरात चर्चेचा विषय ठरले.


ओळखीचे रूपांतर मधूर संबंधात...


प्रसारमाध्यमांतून त्यावेळी आलेल्या वृत्तानुसार, 19 वर्षांची ख्रिस्तिना लंडनची एक सुप्रसिद्ध कॅब्रे डान्सर होती. तिचा डान्स पाहण्यासाठी अनेक उच्चभ्रू आणि तितकीच व्हिआयपी मंडळी येत असत. त्यामुळे तिच्या अनेक उच्चभ्रू मंडळीत ओळखी होत असत. दरम्यानच्या काळात तिची ओळख कॅबिनेट तत्कालीन कॅबिनेट सेक्रेटरी ऑफ वॉर मिनिस्टर जॉन प्रोफ्युमो यांच्याशी झाली. जॉन हे त्या काळात इंग्लंडच्या राजकारणातल रायजिंग स्टार म्हणून ओळखले जात. जॉन आणि ख्रिस्तिना यांच्या ओळखीचे रूपांतर हळूहळू मधूर संबंधात झाले. 


त्यांच्या मधूर संबंधांची पार्लमेंटमध्ये चर्चा


दरम्यन, सुरूवातीच्या काळात या मधूर संबंधांची कोणाला माहिती नव्हती. पण, हळूहळू ही माहिती लोकांना समजली. मात्र, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली तरीही, दोघांनीही आपल्या मधूर संबंधांच्या वृत्ताचे वारंवार खंडण केले. अखेर हे प्रकरण इग्लंडच्या पार्लमेंटमध्येही चर्चेला आले. या नात्याव अनैतिकतेचा शिक्काही मारण्यात आला.


विकेट घेऊनही वादळ शमले नाही..


हे प्रकरण इंग्लंडमध्ये त्यावेळी इतके गाजले की, जॉनवर प्रचंड दबाव आला. मग त्यांनी ख्रिस्टिनासोबत असलेल्या संबंधांचा सर्वप्रधम खुलासा आपल्या पत्नीच्या मार्फत केला. मग त्यांनीह या नात्याबाबत कॅबिनेटलाही सांगितले. मात्र, तरीही हे वादळ शमले नाही. त्यांना राजीनामा द्यावा लागला. इतकेच नव्हे तर, जॉन यांच्या राजीनाम्यानेही हे वादळ शमले नाही. जॉनच्या राजीनाम्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर तत्कालीन पंतप्रधान हारोल्ड मॅकमिलन यांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.


दोन बीग विकेट ख्रिस्तिाच्या पथ्यावर


गंमत अशी की, राजकारणातल्या दोन बिग विकेट पडल्यामुळे ख्रिस्तिना रातोरात स्टार झाली. केवळ इग्लंडच नव्हे तर, जगभरातील प्रसारमाध्यमांतून तिचे फोटो व्हायरल झाले. या प्रसिद्धिनंतर फोटोशूटसाठी तिच्याकडे अनेक नामवंत ब्रॅंडकडून विचारणा होऊ लागली. दरम्यान, तिचे फोटो व्हायरल होत असताना एका फोटोत ती न्यूड दिसली. या प्रकाराबद्धल तिला 6 महिन्यांचा कारावासही भोगावा लागला.