Christmas 2017 : इथे २५ डिसेंबरला नाही वेगळ्या दिवशी साजरा होतो Christmas
ख्रिसमस जगभरात २५ डिसेंबरला साजरा केला जातो हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण हे पूर्ण सत्य नाहीये. २५ डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्याचे मानत याच दिवशी बहुतेक देशांमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो. पण असेही काही देश आहेत जे २५ डिसेंबर ऎवजी वेगळ्या तारखांना ख्रिसमस साजरा करतात.
नवी दिल्ली : ख्रिसमस जगभरात २५ डिसेंबरला साजरा केला जातो हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण हे पूर्ण सत्य नाहीये. २५ डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्याचे मानत याच दिवशी बहुतेक देशांमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो. पण असेही काही देश आहेत जे २५ डिसेंबर ऎवजी वेगळ्या तारखांना ख्रिसमस साजरा करतात.
ख्रिसमसची वेगळी तारीख?
जगात असेही काही देश आहेत जे २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा करत नाहीत. काही देश ६ आणि ७ जानेवारीला ख्रिसमस साजरा करतात. रशियाच्या काही भागांमध्ये आणि मध्य पूर्व भागांमध्ये काही देशांमध्ये ख्रिसमस २५ डिसेंबरला नाहीतर १३ दिवसांनंतर ७ जानेवारीला साजरा केला जातो.
पोप ग्रेगोरी यांच्या कॅलेंडरनुसार
जगभरात जास्तीत जास्ती भागांमध्ये १५८२ मध्ये पोप ग्रेगोरी द्वारे तयार करण्यात आलेल्या कॅलेंडरचा वापर होतो. त्यानुसार २५ डिसेंबरलाच ख्रिसमस साजरा केला जातो. पण अनेक मध्य पूर्व देशांमध्ये आजही ‘ज्यूलियन’ कॅलेंडरचा वापर होतो. ज्यूलियन कॅलेंडरमध्ये २५ डिसेंबर हा दिवस ७ जानेवारीला येतो आणि त्यामुळे या देशांमध्ये ७ जानेवारीला ख्रिसमस साजरा होतो. या देशांमध्ये बेलारूस, इजिप्त, इथोपिया, गॉर्गिया, कझाकिस्तान, सर्बिया आणि रशिया यांचा समावेश आहे.
इटलीमध्येही christmas ची वेगळी तारीख
इटली हा असा देश आहे जिथे २५ डिसेंबर किंवा ७ जानेवारी नाहीतर ६ जानेवारीला ख्रिसमस साजरा होतो. या देशात ‘द फिस्ट ऑफ एपिफेनी’ नावाने हा उत्सव साजरा होतो. असे मानले जाते की, येशू यांच्या जन्मानंतर १२व्या दिवशी तीन लोक त्यांना आपला आशिर्वाद आणि भेटवस्तू देण्यासाठी आले होते. हेच कारण आहे की, सहा जानेवारीला इटलीमध्ये अनेक वर्षांपासून येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा केला जातो.
सांताक्लॉज नाही ही व्यक्ती देते गिफ्ट
बेनाफा ही एकप्रकारे सांताक्लॉजचं फिमेल रूप आहे. असे मानले जाते की, इटलीमध्ये ही वयोवृद्ध महिला लहान मुलांसाठी गिफ्ट घेऊन येते. ती रेनडिअरवर नाहीतर झाडूवर बसून येते. अशीही आख्यायिका आहे की, येशूंच्या जन्मानंतर १२व्या दिवशी तीन ज्ञानी लोक त्यांना आशिर्वाद देण्यासाठी येत होते, तेव्हा बेनाफा त्यांना भेटली आणि तिला त्या लोकांनी सोबत चलण्यास सांगितले. पण बेनाफाने त्यांना नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनीच तिला येशू यांना न भेटण्याचा पश्चाताप झाला. तेव्हापासून बेनाफा प्रत्येक ख्रिसमसला लहान मुलांसाठी गिफ्ट आणते. जेणेकरून एक दिवस येशूंना ती भेटू शकेल.