Czech Republic : जगभर किती अप्रतिम इमारतींची बांधणी करण्यात आली आहे. या बाबतीत धार्मिक लोकांनीही चांगली कामगिरी केलीये. काही अप्रतिम मंदिरं तर कुठे भव्य मशिदी. असाच काहीसा प्रकार चेक रिपब्लिकमध्येही पाहायला मिळालाय. या ठिकाणी व्यक्तींच्या सांगाड्यापासून एक चर्च तयार करण्यात आलं आहे. 100-200 नाही तर तब्बल 40,000 सांगड्यांचा वापर करून या चर्चची उभारणी केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेक रिपब्लिकमध्ये बांधलेल्या या रोमन कॅथोलिक चर्चचे नाव 'सेडलेक ओस्यूरी' असं ठेवण्यात आलं आहे. हे जगातील सर्वात भयानक चर्च मानलं जातं. या चर्चची सजावट मानवी हाडं आणि कवटी करण्यात आली आहे. 


असं म्हटलं जातं या चर्चमध्ये वापरण्यात आलेले मानवांचे सांगाडे प्लेगने बळी व्यक्तींचे आहेत. यामध्ये 15 व्या शतकामध्ये युद्धात मारल्या गेलेल्या लोकांच्या सांगाड्यांचाही समावेश असल्याचं म्हटलं जातं. हे चर्च सजवण्यासाठी कवटीपासून व्यक्तींच्या बोटापर्यंतचा वापर करण्यात आलाय. इतकंच नाही तर या चर्चमधील झुंबरही हाडांपासून तयार करण्यात आलं आहे. काही लोक या चर्चमध्ये पाय ठेवायलाही घाबरतात. मात्री काहींना या चर्चमध्ये येऊन छान शांतता मिळते.


हे चर्च अनोख्या पद्धतीने सजवण्यामागे एक अनोखी कहाणी असल्याचंही समोर आलं आहे. या कहाणीनुसार 278 मध्ये जेरुसलेमच्या पवित्र भूमीतून याठिकाणी माती आणण्यात आली होती. त्यावेळी लोकांची अशी इच्छा होती की मृत्यूनंतर त्यांचं दफन पवित्र ठिकाणीच झालं पाहिजे. 


या कारणामुळे लोकांना या चर्चमध्ये दफन करण्यात आलं. मात्र आता ही जागा सजवण्यासाठी त्याच्या अस्थींचा वापर केला जातो. हे चर्च प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन'च्या सेटप्रमाणे दिसतंय. 17व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत लोकांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह याठिकाणी पुरण्यात आलेत, असं म्हटलं जातं. 


1870 मध्ये या अस्थी कोरण्याचं काम एका सुताराकडून करण्यात आलं होतं. याच मानवी सांगाड्यांचा वापर या चर्चमध्ये करण्यात आलेला.