मुंबई : युरोपियन स्पेस एजन्सीने 2020 मध्ये सौर ऑर्बिटर अवकाशात पाठवलं होतं. नुकतंच, याने सूर्याच्या विक्रमी जवळ पोहोचून फोटो काढले आहेत. अहवालानुसार, 26 मार्च रोजी, ESA चे सौर ऑर्बिटर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुधच्या कक्षेत पोहोचला. याला पेरिहेलियन असंही म्हणतात. ज्यामध्ये ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतराळ यानाला पेरिहेलियनपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांच्यातील सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे कडक उन्हाचं. जेव्हा सोलर ऑर्बिटर सूर्याजवळ त्याच्या जवळ पोहोचलं तेव्हा त्याला 500 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागला. यादरम्यान हीट शील्डने त्याची रक्षा होण्यास मदत झाली.


भविष्यात सोलार ऑर्बिटर सूर्याच्या जवळ जाईल आणि त्याला जास्त तापमानाला सामोरं जावं लागेल, अशी अपेक्षा आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आजच्या आधी कधीही न पाहिलेलं सूर्याचे रूप सर्वांना बघायला मिळालंय.



ESA चं ऑर्बिटर शक्तिशाली फ्लेअर्स, सौर ध्रुवांचं दृश्य आणि सूर्याजवळ एक रहस्यमय सौर 'हेजहॉग' कॅप्चर केलंय. हे सर्व आश्चर्य सौर ऑर्बिटरवर असलेल्या 10 विज्ञान उपकरणांच्या मदतीने टिपण्यात आलंय.



बेल्जियममधील रॉयल ऑब्जर्वेटरी डेव्हिड बर्गमन यांनी म्हटलंय की, हे फोटो खरोखरच चित्तथरारक आहेत. उद्या सौर ऑर्बिटरने डेटा गोळा करणं थांबवले तरीही ते या गोष्टी शोधण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करतील.


दुसरीकडे शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हे निरीक्षण सूर्याचं वर्तन समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती देतील. यामध्ये सूर्याचं चुंबकीय क्षेत्र आणि सौर उत्सर्जन यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांना अजून सूर्याविषयी फार खोलवर माहिती मिळू शकलेली नाही.