मुंबई : कोलंबियाच्या प्रसिद्ध गायिका शकीराने ( Shakira) कथित कर चुकवल्याच्या प्रकरणाचा तपास करणार्‍या स्पॅनिश न्यायमूर्तींनी तिच्यावर खटला चालविण्याची शिफारस केली आहे. तपासात असा निष्कर्ष काढला गेला की पॉप स्टारने देशात कर भरण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे पालन केले नाही, याचा पुरावा असल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे.


3 वर्षांच्या तपासात पुरावे सापडले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायमूर्ती मार्को जुबेरियस (Marco Juberias)यांनी आपल्या आदेशात म्हटले की, '3 वर्षांच्या त्याच्या तपासात असे आढळले की या प्रकरणात शकीरावर न्यायालयात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. या निर्णयाच्या विरोधात अपील करता येईल.


'आम्ही थकीत कर भरला होता'


फिर्यादी यांनी डिसेंबर 2019 मध्ये असा आरोप केला होता की या गायिकाने 2012 ते 2014 दरम्यान स्पेनमध्ये 16.4 दशलक्ष डॉलर्सचा कर भरला नाही. पनामामध्ये तिचे निवासस्थान असूनही, या काळात ती स्पेनमध्ये राहत होती. 44 वर्षीय शकीराने जून 2019 मध्ये तिच्या साक्षीमध्ये कोणतेही चुकीचे कृत्य केले नसल्याचे म्हटले होते. शकीराच्या जनसंपर्क टीमने सांगितले की, कर कार्यालयाने थकबाकीची माहिती दिल्यानंतर तिने ती रक्कम भरली आहे.


दंड ठोठावला जाऊ शकतो, शिक्षा देखील शक्य आहे


असे म्हटले जात आहे की कर चुकल्याबद्दल दोषी ठरल्यास शकीरा हिला दंड होऊ शकतो. तसेच, तिला काही काळ तुरुंगात जावे लागू शकते. तथापि, न्यायमूर्ती प्रथमच गुन्हेगाराला दोन वर्षांपेक्षा कमी कारावास भोगल्यास त्याची शिक्षा माफ करु शकतात. त्यामुळे आता स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही.