न्यूयॉर्क :  उकाड्यामुळे अमेरिकन ओपनच्या पहिल्या सामन्याच्या दरम्यान टेनिस कोर्टवर एलाइज कार्नेट हिने आपला शर्ट बदलला. या घटनेनंतर नवा वाद निर्माण झालाय. यूएस टेनिस असोसिएशन (यूएसटीए) याबाबत म्हटलेय, फ्रान्स खेळाडूला या प्रकारानंतर समज देणे चुकीचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ठिकाणी जास्तच उकाडा असल्याने दहा मिनिटे कोर्टच्या बाहेर जाण्यास परवानगी दिली जाते. अशाच ब्रेकच्यावेळी तिने कोर्टवर जास्त घाम आल्याने आपला शर्ट बदलला. त्यानंतर तिने खेळ सुरु केला. खेळ सुरु होण्याआधी तिने पटकन शर्ट बदलला. मात्र, तिने तो उलटा घातला. मात्र, तिचे याकडे लक्ष नव्हते. तिच्या मित्राने शर्ट अलटा असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर तिने कोर्टकडे पाठ करत तो शर्ट बदलला यावेळी तिने योग्य पद्धतीने बदलला.



त्यानंतर चेअर अंपायर क्रिस्टियन रस्क यांनी कार्नेट हिला समज दिली. फ्रान्सची खेळाडू स्वीडनच्या योहाना लार्सेनकडून ४-६, ६-३ अशा सेटने पराभूत झाली. ज्यावेळी मी शर्ट बदलला त्यावेळी मला आचारसंहितेचा भंग केल्याची समज देण्यात आली. या निर्णयामुळे ही हैराण झाले. हे खूप धक्कादायक आहे. तिच्या मताशी अमेरिकन टेनिस महासंघाने सहमती दर्शविली आहे.