मुंबई : कोरोना व्हायरसचा कहर आता जगभरात पसरला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत हजारो लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. चीनच्या वुहान शहरातून आलेला हा व्हायरस काही दिवसांच्या आत जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला. कोरोना व्हायरस नेमका कसा आला, याबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. अमेरिकेने तर या व्हायरसबाबत चीनकडे संशयाचं बोट उपस्थित केलं आहे. त्यातच आता न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या हाँगकाँगच्या ब्लॉगर जेनिफर जेंग यांनी धक्कादायक दावे केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेनिफर जेंग यांनी चीनमधल्या मोबाईल वापरणाऱ्यांची काही आकडेवारी जगासमोर आणली आहे. ही आकडेवारी भीती वाढवणारी आहे. जेनिफर जेंग यांनी चीनची मोबाईल कंपनी चायना मोबाईलने रिलीज केलेल्या आकड्यांचा आधार घेतला आहे. या आकड्यांनुसार जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कंपनीचे ८.११६ मिलियन म्हणजेच ८१ लाख ग्राहक गायब झाले आहेत.



चीनची दुसरी कंपनी चायना यूनीकॉमच्या जानेवारी महिन्यातल्या आकडेवारीनुसार १ मिलियन म्हणजेच १० लाख ग्राहक कमी झाले आहेत. 



चीनची आणखी एक कंपनी चायना टेलिकम्युनिकेशनच्या आकड्यांनुसार फेब्रुवारी महिन्यात त्यांचे ५.६ मिलियन म्हणजे ५६ लाख ग्राहक गायब आहेत.



या तिन्ही मोबाईल कंपन्यांची आकडेवारी जवळपास १.४६ कोटी एवढी आहे. म्हणजे चीनमध्ये १.५ कोटी मोबाईल ग्राहक अचानक गायब झाले आहेत. ही लोकं नेमकी गेली कुठे? हे ग्राहक कोरोना व्हायरसचे शिकार झाले आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.


कोरोना व्हायरसमुळे ३,२७० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा चीन करत आहे, मग ही लोकं गायब होण्याचं कारण काय? हे अजून गूढच आहे.


चीनची लपवाछपवी


चीनमध्ये जेव्हापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, तेव्हापासून चीनने गोष्टी लपवण्याचाच प्रयत्न केला आहे. चीनने वारंवार लपवाछपवी करुन आपल्या इथल्या कोरोनाच्या बातम्या दडवल्या, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत गेली. चीनने सुरुवातीला कोरोनाच्या पहिल्या रुग्णाला ३ आठवड्यांपर्यंत लपवून ठेवलं. ३ आठवडे चीनने या रुग्णाबाबत जगाला माहिती दिली नाही.


टेनसेंट कंपनीचा रिपोर्ट लीक


मागच्या महिन्यात चीनची कंपनी टेनसेंटचा एक रिपोर्ट लीक झाला होता. या रिपोर्टमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २४ हजार ५८९ सांगण्यात आली होती. लीक रिपोर्टमध्ये १ लाख ५४ हजार लोकांना कोरोना झाल्याचा दावा करण्यात आला होता. तर संशयित रुग्णांची संख्या ७९ हजार ८०८ एवढी सांगण्यात आली होती. चीनच्या कंपनीचा हा रिपोर्ट त्यांच्या सरकारी आकडेवारीपेक्षा १० टक्के जास्त होता.


कोडिंगमध्ये गोंधळ झाल्यामुळे टेनसेंटची ही माहिती लीक झाल्याचा अंदाज आहे. तर काहींनी टेनसेंटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने मुद्दाम जगाला सत्य कळण्यासाठी हा डेटा लीक केल्याचा दावाही केला जातोय. हा रिपोर्ट लीक झाल्यानंतर काही वेळातच कंपनीने त्यांचे आकडे बदलले आणि नवे सरकारी आकडे जाहीर केले.


सॅटेलाईट फोटोंनीही शंका वाढवली


फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चीनच्या वुहान आणि चोंगक्विंग शहरातले काही सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर काहीतरी जाळल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. या दोन्ही भागांच्या वरती हवेत मोठ्याप्रमाणावर सल्फर डाय ऑक्साईड गॅस दिसत आहे. वुहानच्या वायूमंडळात सल्फर डाय ऑक्साईडचा स्तर १,७०० यूजी/घन मीटर आहे. ही आकडेवारी नेहमीपेक्षा २१ पटीने जास्त आहे. तज्ज्ञांच्या मोठ्याप्रमाणावर मृतदेह जाळल्यामुळे सल्फर डाय ऑक्साईडचं प्रमाण एवढं वाढू शकतं.



या दोन्ही शहरांमध्ये वरती पसरलेला सल्फर डाय ऑक्साईड पाहून इंटेलवेब नावाच्या संस्थेने दावा केला की, या परिसरात कमीतकमी १४ हजार मृतदेह जाळण्यात आले. चीनच्या सोशल मीडियावरही वुहान शहराबाहेर मृतदेह जाळण्यात आल्याचं व्हायरल झालं. वुहान आणि चोंगक्विंग या दोन शहरांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. या दोन्ही शहरांमधलं अंतर जवळपास ९०० किमी एवढं आहे.