मुंबई : जगात कोरोनाची (Coronavirus) मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच विषाणूचा फैलाव रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिका, ब्राझिल, रशिया, स्पेन, यूके इटली, पेरु आदी देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे घबराट पसरली आहे. भारतातही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक देशांनी कोरोनाला रोखण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही कोरोनाच्या रुग्णात सतत वाढ होताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएफपीच्या वृत्तानुसार, जगभरात कोरोना प्रकरणांची संख्या ७० लाखांपेक्षा जास्त गेली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. तर worldometersच्या माहितीनुसार जगात ७१,९३,४७६ रुग्ण आहेत. अमेरिकेत २० लाख २६ हजार ४९३, ब्राझिल ७ लाख १० हजार ८८७, रशिया ४ लाख ७६ हजार, ६५८, स्पेन २ लाख, ८८ हजार ७९७, यूके २ लाख ८७ हजार३९९ आणि भारतात २ लाख ६५ हजार ९२८ इतकी रुग्ण संख्या आहे. जगात भारताचा क्रमांक सहावा आहे. त्यानंतर इटलीचा आहे. इटलीत २ लाख ३५ हजार २८७ रुग्ण संख्या आहे.



दुसरीकडे, जर आपण भारताबद्दल बोललो तर येथे सोमवारी कोरोनाचे ९ हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. सोमवारी, देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. ९ हजाराहून अधिक रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे सतत सहा दिवसी दिसून आले आहे. त्यामुळे भारतात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


जूनच्या पहिल्या आठवड्यात 60 हजाराहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडलेत.  गेल्या २४ तासांत भारतात कोविड-१९ रुग्णांचा विक्रम नोंदवला गेला आहे. ९ हजार ९८३ नवीन रुग्ण सापडलेत. २ लाख ६५ हजार ९२८ इतकी रुग्ण संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे आणखी २०६ मृत्यू तर मृतांची संख्या ७ हजार १३५ वर गेली.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात १ लाख २५ हाजर ३८१ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर या आजारातून १ लाख २४ हजार ९४ रुग्ण ठणठणीत बरे झालेले आहेत. तर एक रुग्ण देशाबाहेर गेला आहे. 



आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "आतापर्यंत सुमारे ४८.३६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. पुष्टी झालेल्या कोरोना प्रकरणात परदेशीय नागरिकांचा समावेश आहे.