न्यूयॉर्क: जगभरात कोरोनाचं कहर सुरूच आहे. भारतात दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटेचा धोका असताना आता मोठी अपडेट कोरोना संदर्भातली समोर येत आहे. कोरोनाच्या आतापर्यंतच्या व्हेरिएंटमध्ये हा व्हेरिएंट सर्वात जास्त धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे वैज्ञानिकांकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट नुसार अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनच्या एका डॉक्युमेंटमध्ये देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाही या व्हेरिएंटचा धोका आहे. भारतात सर्वात पहिल्यांदा डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण सापडल्याचा दावा केला जातो. आता डेल्टा व्हेरिएंट वेगानं पसरत आहे. इंडोनेशियामध्ये डेल्टा व्हेरिएंटने 800 हून अधिक मुलांचा बळी घेतला आहे. 


रिपोर्टनुसार या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
ज्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले त्यांनाही याचा धोका आहे. त्यांना नाक आणि घशामध्ये त्रास जास्त होत आहे. लस न घेतलेल्या लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या ज्या समस्या नाक आणि घशाशी निगडीत आहेत त्याच समस्या आणि लक्षणं ही या व्हेरिएंटची लागण झाल्यावर रुग्णांमध्ये आढळून येत असल्याचं समोर आलं आहे. असं द वॉशिंगटन पोस्ट’ जमा केलेल्या डॉक्युमेंटवरून समोर आलं आहे.  


बी.1.617.2  डेल्टा व्हेरिएंट हा वेगानं आपला संसर्ग पसरवू शकतो त्यामुळे त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. त्यामुळे वैज्ञानिकांचीही चिंता वाढली आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना विरुद्ध लसीकरण मोहीम राबवली जात आहे. भारतातही तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. 


भारतात तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही या आजाराचा धोका होऊ शकतो अशी भीती आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेमध्ये डेल्टा व्हेरिएंट अधिक गंभीर स्वरुप घेऊ शकतो अशी चिंता तज्ज्ञांना सतावत आहे त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपली काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केली आहे. 


अमेरिकेत 16.2 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालं त्यापैकी 35,000 रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं आढळून आली आहेत. सौम्य लक्षणं आढळून येणाऱ्यांची गणती यामध्ये नाही नाहीतर हा आकडा आणखी वाढू शकतो असंही तज्ज्ञांचं मत आहे.