नवी दिल्ली : कोविड-19 महामारीच्या अत्यंत आव्हानात्मक टप्प्यातून जात असलेल्या रशियाने मंगळवारी दररोज होणाऱ्या मृत्यूंचा नवा विक्रम प्रस्थापित केला, तर corona संक्रमित लोकांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. नऊ दिवसांचा लॉकडाऊन दोन दिवसांपूर्वी संपला आहे आणि त्या दिवसापासून दररोज बाधितांची संख्या वाढू लागली आहे. देशात कोरोना संसर्गामुळे (Corona infection) 1,211 लोकांचा मृत्यू झाला आहे. साथीचा रोग सुरू झाल्यापासून दररोज मृत्यूची ही सर्वात मोठी संख्या आहे. नवीन बाधितांची संख्या 39,160 झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर्मनीमध्ये संसर्ग दर सर्वोच्च पातळीवर


देशातील सात दिवसांच्या कोविड संसर्गाचा दर महामारी सुरू झाल्यापासून सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात 50 पॉइंट्सच्या वाढीसह सोमवारी संसर्ग दर प्रति एक लाख मागे 201.1 वर पोहोचला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, जेव्हा कोरोनाची दुसरी लाट सुरू होती, तेव्हा जास्तीत जास्त संसर्ग दर एक लाख लोकसंख्येमागे 197.6 होता.


रोमानियामध्ये रुग्णालये आणि शवगृहे भरली


गेल्या दोन महिन्यांपासून रोमानियामध्ये कोरोना संसर्गामुळे दररोज शेकडो लोक आपला जीव गमावत आहेत. देशातील प्रमुख रुग्णालयातील शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जागा उरलेली नाही. रुग्णालयेही भरली आहेत. 19 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशात संपूर्ण युरोपमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.


नेदरलँड्स: दक्षिणेकडील लिम्बर्ग प्रांतातील आरोग्य अधिकार्‍यांनी मंगळवारी सरकारला इशारा दिला की रुग्णालये जवळजवळ भरली आहेत आणि नवीन रूग्णांना दाखल करणे कठीण आहे. जर्मनी आणि बेल्जियमच्या सीमेला लागून असलेल्या या प्रांतातील पाच रुग्णालयांनी ही चिंता व्यक्त करणारे निवेदन जारी केले आहे.


यूएस : कोविड लसीकरणावरील बायडेन प्रशासनाच्या आदेशाला फेडरल कोर्टाने स्थगिती दिल्यानंतरही व्हाईट हाऊसने खाजगी कंपन्यांना कर्मचारी लसीकरण नियम अवलंबण्याचे आवाहन केले आहे. व्हाईट हाऊसचे डेप्युटी प्रेस सेक्रेटरी कॅरिन यांनी सांगितले की, “आम्हाला वाटते की लोकांनी आणखी प्रतीक्षा करू नये.


ब्रिटन : सोमवारी 32,322 लोकांना कोरोना संसर्गाची पुष्टी झाली, तर 57 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात देशातील संसर्ग दर 16.6 टक्क्यांनी कमी झाला आहे, परंतु मृत्यूचे प्रमाण 8.2 टक्क्यांनी वाढले आहे.


चीन : मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी चीनमध्ये कोरोना संसर्गाची 62 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.


पाकिस्तान: आरोग्य मंत्रालयाने असा दावा केला आहे की मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच कोरोना संसर्गाचा दर एक टक्क्याच्या खाली गेला आहे. सध्याचा संसर्ग दर 0.94 टक्के आहे.