नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सर्व जगावर परिणाम झाला आहे. जगात आतापर्यंत लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. इराणची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. खरंतर, कोरोनाची दुसरी लाट इराणमध्ये सुरू आहे, ज्यामुळे येथे संक्रमणामुळे मृत्यूची संख्या अचानक वेगाने वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर 4 मिनिटांत एक मृत्यू


इराणमधील आरोग्य अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की, तेहरानसह देशातील सर्व रुग्णालयांची परिस्थिती झपाट्याने कोसळली आहे. इराणमध्ये कोरोनाबाधित रूग्णांसाठी रुग्णालयात बेडच शिल्लक नाहीत.


कोरोना फाइटर्स खचले


देशाच्या कोरोना टास्क फोर्सच्या प्रमुखांनी इराणच्या अधिकृत वृत्तवाहिनीला सांगितले की, परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की तिथले सर्व आरोग्य कर्मचारी शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकलेले आहेत. आणि कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करूनही परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही.


आरोग्यमंत्र्यांचा इशारा


सामाजिक अंतराचे पालन न केल्यास गंभीर परिणाम होण्याचा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. इराणचे उपआरोग्य मंत्री इराज यांनी गेल्या आठवड्यात अशी भीती व्यक्त केली होती की, 'देशातील कोरोनामुळे दररोज मृत्यूचा आकडा 600 पर्यंत पोहोचू शकेल'.


लॉकडाउन 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवले


इराणमध्ये शाळा, दुकाने, रेस्टॉरंट्स, मशिदी आणि इतर सर्व संस्था पुन्हा बंद कराव्या लागल्या आहेत. वास्तविक, यापूर्वी लावण्यात आलेल्या निर्बंधांचा कालावधी आज संपत होता, परंतु परिस्थिती नियंत्रणात नसताना लॉकडाउन 20 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहे.


21 प्रांतांमध्ये रेड अलर्ट 


देशातील 43 महत्वाच्या वसाहतींमध्ये जिथे संसर्गाचे प्रमाण शिगेला आहे, तेथे येत्या आठवड्यात आणखी कठोर पावले उचलली जाऊ शकतात. इराणच्या 31 पैकी 21 प्रांत सध्या कोरोनो विषाणूच्या संसर्गामुळे रेड अलर्टवर आहेत.